जळगाव प्रतिनिधी – जागतिक योग दिनानिमित्त भवरलाल अण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे आठ दिवसीय योग शिबीराचे आयोजन भाऊंचे उद्यान येथे करण्यात आले आहे.
आसन म्हणजे शारिरीक व्यायाम नव्हे व प्राणायम म्हणजे श्वसनाची कसरत नव्हे तर योग एक जीवनशैली या संकल्पनेस साकार करण्यासाठी 22 जून पासून सर्व नव्या व जुन्या साधकांसाठी भाऊंचे उद्यान येथे 6.45 ते 7.45 या वेळेत विनामूल्य आठ दिवसीय शिबीराचे आयोजन केले आहे. शिबीरादरम्यान योग शिक्षक सुभाष जाखटे योगाचे मार्गदर्शन करतील. शिबीरामध्ये सहभागी होण्यासाठी भाऊंचे उद्यान येथे नाव नोंदणी करावी व या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.