स्त्यावर नमाज अदा करणाऱ्या युवकांस पोलीस कर्मचाऱ्याने लाथ मारून बाजूला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी घटनेचा व्हिडीओ x या सोशल मीडिया प्लॅटफार्मवर पोस्ट करून क्या यही नया भारत है? असा प्रश्न उपस्थित केला आहे. यावेळी त्यांनी भाजपा -आरएसएस यांच्यावर जोरदार टीका केली तसेच काँग्रेसने भाजपवर जोरदार हल्ला चढवल्यानतंर अखेर त्या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले.
मुसलमानों के विनाश का दौर शुरू हो गया है.
क्या यही नया भारत हैं?
बीजेपी-आरएसएस को लात मार के हटाओ आने वाले चुनाव में. pic.twitter.com/vbO5HP6oS9
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) March 8, 2024
या व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये रस्त्यावर मुस्लिम समुदाय नमाज अदा करताना दिसत असून या लोकांना बाजूला सारण्यासाठी ड्युटीवर असलेला एक पोलीस कर्मचारी या समुदायतील काही युवकांना मागून लाथा मारणारतांना दिसत आहे.हा पोलिस जवान माणुसकी विसरला वाटते. हा कोणत्या प्रकारचा द्वेष आहे, अशा शब्दांत सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटत आहे.
काँग्रेस खासदार इमरान प्रतापगढी यांनी दिल्ली पोलिसांनी यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. घटनेचा व्हिडिओ आणि येणाऱ्या गंभीर प्रतिक्रीया पाहून डीसीपी मनोज मीणा यांनी संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाई करत त्याला निलंबित केले तसेच पोलिसांनी शांतता राखण्याचे आवाहनही केले.