राज्यातील महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याने अद्यापही लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली नाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर असतांना जागा वाटपा बाबत प्राथमिक झालेली चर्चा आता दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक अंकी जागा मिळणार असल्याचं स्पष्ट झालं असून मुख्यमंत्री शिंदेच्या शिवसेनेलाही काही जागांवर समाधान मानावं लागणार आहे, काल अमित शहा यांच्या दिल्लीच्या निवास्थानी झालेल्या बैठकीत लोकसभा निवडणूक संदर्भात अंतिम चर्चा झाली आहे त्यामुळं लवकरच उमेदवारांची यादी जाहीर होईल.
ठरलं!भाजपा सर्वाधिक जागा लढविणार…
महाराष्ट्र राज्यात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप सर्वाधिक जागा लढवणार असल्याचं ठरलं असून त्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे आणि त्या खालोखाल जागा या अजित पवार गटासाठी सोडण्यात येणार आहेत राज्यातील महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी अमित शाहंनी पुढाकार घेतला असून त्यातून मार्गही निघाल्याची माहिती आहे.
भाजपाचे मुंबई लक्ष!
मुंबईत भाजपकडून जास्तीत जास्त जागा लढवण्यात येणार आहेत, यावरून भाजपाचे मुंबई लक्ष असल्याचे दिसून येतं आहे.दरम्यान शिंदे गटाने मुंबईतील एक जागा भाजपला सोडण्याची तयारी दाखवल्याची माहिती आहे. त्याचवेळी ठाणे आणि कल्याणची जागा आपल्याकडेच राहावी यासाठी शिंदे गट आग्रही असल्याची माहिती आहे.
अजित पवारांना एक अंकी जागा
अजित पवारांनी अमित शाह यांच्यासमोर जागावाटपाचा प्रस्ताव सादर केला. सुरुवातीला शिंदे गटाला जितक्या जागा दिल्या जातात तितक्याच आम्हाला मिळाव्यात अशी मागणी त्यांनी केली होती. पण आता अजित पवारांना एक अंकी जागा मिळणार हे नक्की झालं आहे.