जळगाव – चंद्रमे जे अलांछन | मार्तंड जे तापहीन | ते सर्वांही सदा सज्जन | सोयरे होतु || …. आपल्या सरळ,साध्या प्राकृतिक भाषेत ज्ञानेश्वरी आणि पसायदान द्वारे भक्तीचा आणि मोक्षाचा मार्ग दाखवणारे,संत ज्ञानेश्वर माऊली हे आजही महाराष्ट्राच्या कणाकणात विसावलेले आहेत. नुकतेच आळंदी येथे भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकी ताई पाटील यांनी जाऊन संत ज्ञानेश्वर माऊलीच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. यावेळी मंदिरातील गाभाऱ्यात किर्तन आणि सत्संगाचे भाग्य लाभले. आळंदी येथील मंदिरातील ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञान ऊर्जा ही नेहमी दिशा देत असते,याच ज्ञान उर्जेतून विश्वकल्याणाचा मार्ग तेवत आहे.
यावेळी मंदिर गाभाऱ्यातील कीर्तनकार ह भ प गोपाल महाराज विवरेकर यांच्या कीर्तनात आणि टाळ मृदंगाच्या सानिध्यात मंत्रमुग्ध झाले. वारकरी संप्रदायातून समाजास मार्गदर्शन करणाऱ्या ह भ प संतोष महाराज लाजणे, ह भ प दिलीप महाराज ठाकरे, ह भ प ज्ञानेश्वर महाराज जाधव, ह भ प लक्ष्मण महाराज पाटील, ह भ प चंदिले नाना, ह भ प गोपाल महाराज विवरेकर,ह भ प अमोल महाराज रावेरकर, ह भ प रविंद्र महाराज वाव्हळ, ह भ प नामदेव महाराज नेतेकर या सर्व विभूतींचा यावेळी टाळ देऊन सत्कार केला. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी यांच्यामार्फत मला ज्ञानेश्वरी स्वरूपात आशीर्वाद मिळाले.
यावेळी ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदीचे व्यवस्थापक श्री ज्ञानेश्वर वीर महाराज,विष्णू नारायण बोरोले, राहुल पाटील, कृष्णाजी डहाके पाटील,दैनिक सकाळचे पत्रकार विलास रामचंद्र काटे, दैनिक सामना पत्रकार अर्जुन मंदनकर आधी विभूतींची उपस्थिती होती. हा योग ह भ प धनंजय महाराज धांडे यांच्या सहकार्यातून घडून आला.