लोकसभा निवडणूक जस जशी जवळ येतं आहे तस तसं देशासह राज्यातील राजकारण तापायला लागलं आहे, अवघ्या काही दिवसांवर निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाकडून जाहीर होतील मात्र अद्याप महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटलेला दिसून येतं नाही. भारतीय जनता पार्टी राज्यातील ४८ लोकसभा जागापैकी ३२ जागा लढविणार असल्याचं समोर येतं असल्याने भाजपाच्या मित्रपक्ष जाम टेन्शन आले असल्याचं समजतं. जर ३२ जागा भाजपाने लढविल्यास मित्र पक्षांच्या वाट्या येतचं काय असा सवाल निर्माण होतं असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे शिलेदार रामदास कदम यांनी भाजपाला थेट आव्हानच दिलं आहे, कदम यांनी म्हटलं आहे की आम्ही मोदी, शहा यांच्यावर विश्वास ठेवून सोबत आलो आहोत आमचा केसांनं गळा कापू नका असं म्हणत भाजपाला सुनावले आहे.
काय म्हणाले रामदास कदम
महाराष्ट्र भाजपा जे शिंदे गटासोबत जे काही करत आहे ते अतिशय घृणास्पद आहे. त्यामुळे माझी प्रामाणिक इच्छा आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे कान उपटले पाहिजेत, त्यांचे कान पकडले पाहिजेत.
ते पुढे म्हणाले,’प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा आहे. परंतु, जे लोक तुमच्यावर विश्वास ठेवून आले आहेत त्यांचा केसाने गळा कापू नका. असं केल्यास भाजपाकडून लोकांमध्ये एक वेगळा संदेश जाईल, याचं भान त्यांनी ठेवायला हवं. आपल्यातील संबंधांबाबत लोकांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये याचं भान भाजपाच्या काही लोकांना असणं आवश्यक आहे. भाजपाने केसाने गळा कापू नये, अन्यथा माझं नाव रामदास कदम आहे’ हे लक्षात ठेवावं. असा इशाराही कदम यांनी दिला आहे.