भाजपचं ३२ लोकसभा जागेवर लढण्याचं ठरलं असून भाजपा नेते लोकसभेच्या ३२ जागा लढविण्यावर ठाम आहेत. दरम्यान काल पासून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर असून रात्री उशिरा मुंबई दाखल झाल्यावर महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाल्याचे समजत असून अमित शहा यांनी जागा वाटपाचा तिढा सोडविण्यासाठी फॉर्मुला सांगितला आहे त्यामुळं महायुतीमधील जागावाटपाचा तिढा लवकरच सुटणार असल्याचं चित्र आहे असं असलं तरी भाजप लोकसभेच्या ४८ जगापैकी ३२ जागा लढवण्यावर ठाम असल्याचं समोर आलं आहे.
दरम्यान भाजपा ३२ जागांवर ठाम असून काही जागांवर शिंदे गट आणि अजित पवार गट सुद्धा आग्रही असल्याच समजतं मात्र जागा वाटपाचा तिढा सोडविण्यासाठी अमित शहा यांनी महायुतीच्या नेत्यांना मोलाचा सल्ला दिला असून कोणताही हट्ट न ठेवता लोकसभेसाठी व्यवहार्य जागावाटप करा, असं केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगितल्याचे समजते.लोकसभेप्रमाणे विधानसभेलादेखील आपण एकत्रितपणे सामोरे जाणार आहोत. आता आपल्यासाठी लोकसभेची लढाई अत्यंत महत्त्वाची असल्याचं सुद्धा केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी सांगितलं.
भाजपच्या ३२ लोकसभा जागांची संभाव्य उमेदवारांची यादी अशी असू शकते
1.जळगाव : उन्मेष पाटील
2.रावेर : अमोल जावळे/ रक्षा खडसे
3.धुळे : प्रताप दिघावकर
4. नंदूरबार : हिना गावित
5. चंद्रपूर : सुधीर मुनगंटीवार
6. नागपूर :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
7. जालना : रावसाहेब दानवे
8. अकोला : संजय धोत्रे
9. ईशान्य मुंबई : मनोज कोटक
10. सोलापूर : सिद्धेवर महाराज
11. कोल्हापूर : उमेदवार अजून निश्चित नाही
12. भंडारा-गोंदिया : सुनिल मेंढे
13. बीड : पंकजा मुंडे.
14. माढा – रणजितसिंह निंबाळकर
15. गडचिरोली : अशोक नेते
16. भिवंडी : कपिल पाटील
17. सांगली : संजयकाका पाटील
18. सातारा : उदयनराजे भोसले
19. पुणे : मुरलीधर मोहोळ.
20. दिंडोरी : भारती पवार
21. हिंगोली : तानाजी मुरकुटे
22. उस्मानाबाद : बसवराज पाटील
23. उत्तर मुंबई : गोपाळ शेट्टी /केंद्रीय मंत्री पियुष गोयल
24. संभाजीनगर : विद्यामन मंत्री अतुल सावे / केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड.
25: उत्तर मध्य मुंबई : आशिष शेलार
26. ठाणे : डॉ.संजीव नाईक
27. रत्नागिरी-सिंधुदुर्ग : नारायण राणे.
28. दक्षिण मुंबई : राहूल नार्वेकर
29. नांदेड : मिनल खतगावकर
30 . अहमदनगर : सुजय विखे पाटील / राम शिंदे
31.अमरावती : नवनीत राणा /आनंदराव अडसूळ
32. पालघर : उमेदवार अजून निश्चित नाही