जळगाव(प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पुढील २५ वर्षाचे व्हिजन असून मोदीजी भविष्यातील भारतासाठी सज्ज आहेत,२०३० पर्यंत भारताची जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनविण्यासाठी नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवा असे आवाहनकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज दिनांक ५ रोजी जळगाव येथील भाजपाच्या युवा संमेलन कार्यक्रमात उपस्थिती युवक युवातींना केले.यावेळी कार्यक्रमाची सुरवात महाराष्ट्र गीताने तर समारोप राष्ट्रगीताने झाला, अमित शहा यांना ऐकण्यासाठी संपूर्ण सभा मंडप युवकांनी तुडुंब भरला होता तर संपूर्ण परिसर मोदींच्या जायघोषाने दनाणून निघाला. अमित शहा यांनी भाषणाला सुरवात करताच उपस्थित युवकांनी मोबाईल टॉर्च लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
बोलतांना अमित शहा पुढे म्हणाले की,२०३५ पर्यंत अंतराळ स्टेशन स्थापन करणे, २०३६ मध्ये ऑलिम्पिकचे आयोजन आणि २०४० मध्ये एका भारतीयाला चंद्रावर पाठवून मून मिशन पूर्ण करण्याचा प्लॅन पीएम मोदींकडे आहे. दरम्यान भाजपला ४०० पार करण्याचे आवाहन देखील अमित शहा यांनी या सभेदरम्यान केले.
शरद पवारांनी हिशोब द्यावा – अमित शहा
शरद पवारांनी गेल्या ५० वर्षात काय केलं? याचा त्यांनी हिशोब द्यावा. मी गेल्या १० वर्षाचा हिशोब तुम्हाला देतो, असा थेट हल्लाबोल करत महाविकास आघाडीची रिक्षाचे तीनही टायर पंक्चर असल्याची टीका अमित शहा यांनी केली.
राहुल गांधींचा राहुल बाबा म्हणून उल्लेख
गेल्या दोन लोकसभेत राहुल गांधी
यांचे यान लँड झाले नाही. यावेळी राहुल गांधी तिसऱ्यांदा लँडिंगचा प्रयत्न करत असून यावेळीसुद्धा त्यांना यश येणारं नसून राहुल बाबा म्हणून उल्लेख करत काँग्रेस वर निशाणा साधला.तर पंक्चर रिक्षा विकास करू शकत नसल्यानेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच महाराष्ट्राचा विकास करू शकेल असे शहा यांनी आपल्या भाषणा दरम्यान सांगितलं.
अमित शहांचे नवमतदारांना आवाहन
तुमच्यापैकी जे पहिल्यांदा मतदान करणार आहेत, मी खास करून त्या तरुण मित्रांना सांगायला आलो आहे की, तुम्ही त्या पक्षाला, नेत्याला मत द्या, जो भारत मातेला जागतिक स्थानावर आणू शकेल आणि एक महान भारत घडवू शकेल. ‘लोकशाही मजबूत करणाऱ्या पक्षांना मत द्या असं आवाहन त्यांनी नवं मतदारांना केलं.
नरेंद्र मोदी यांनी भारताला आत्मनिर्भर बनवले
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्त्वाखाली देशाचा विकास कसा झाला याची माहिती देताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला आत्मनिर्भर बनवले. त्यांच्या कार्यकाळात देशाची अर्थव्यवस्था बळकट झाली असून सर्वच क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली आहे असेही ते म्हणाले.
मोदींनी विकास साधला
गेल्या १० वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अंतराळापासून सेमी-कंडक्टरपर्यंत, डिजिटलपासून ड्रोनपर्यंत, AI पासून वॅक्सिनपर्यंत आणि 5G पासून फिनटेकपर्यंत प्रत्येक क्षेत्रात तरुणांसाठी दरवाजे उघडण्याचे काम करत मोदींनी विकास साधला असल्याचं सांगितले.
विरोधक घराणेशाहीचे राजकारण करताय
मोदीजींना विरोध करणाऱ्या अहंकारी आघाडीतील सर्व पक्ष हे कुटुंबावर आधारित पक्ष आहेत.
सोनिया गांधींना राहुल गांधींना पंतप्रधान करायचे आहे.
उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचे आहे.
शरद पवारांना आपल्या मुलीला मुख्यमंत्री करायचे आहे.
ममता दीदींना त्यांच्या पुतण्याला मुख्यमंत्री करायचे आहे.
स्टॅलिनला आपल्या मुलाला मुख्यमंत्री बनवायचे आहे.
देशातील विरोधी पक्ष केवळ घराणेशाहीचे राजकारण करत आहेत, अशा शब्दांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांवर घणाघाती हल्ला केला. या देशाचा विचार केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात. त्यामुळे आपल्याला यावेळी तिसऱ्यांदा पीएम मोदी यांना पंतप्रधान करायचे आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,मंत्री गिरीष महाजन,केंद्रीय मंत्री भारती पवार, मंत्री विजयकुमार गावित,खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षा खडसे, खासदार हिना गावित, आमदार राजुमामा भोळे, डॉ. उल्हास पाटील, उज्वला बेंडाळे, जळकेकर महाराज, अमोल जावळे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.