चाळीसगाव तालुक्यातील शिरसगाव येथील एका मजुर ग्रामस्थाचा मन्याड- गिरणा या जोड प्रकल्पासंबधी इतर समस्या साठी चाळीसगाव येथे आज २७/२/२०२४ रोजी तहसीलदार यांना निवेदन व मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला…!
श्री दिलीप फकीरा पाटील रा.शिरसगाव ता चाळीसगाव वरील विषयान्वये आपणाकडे रितसर निवेदन सादर करतो की, मी वरील ठिकाणाचा कायमचा रहिवाशी असुन मजुरी करुन पोट भरतो. तसेच ८ ते १० वर्षांनी मन्याङ धरण भरते, शेतीसाठी, जनावरांना व मानवास पिण्यास पाणी नाही. आणि जनावरांना चारा नाही, शेत मजुरास हातास काम नाही, त्यात यावर्षीं चाळीसगांव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर होवुन सुध्दा आम्हाला कुठलाही फायदा नाही. ज्या सवलती दुष्काळग्रस्त तालुक्याला मिळायला हव्या होत्या. अशा कुठल्याही सवलती तालुक्याला मिळत नाही. त्यासाठी मन्याड घरण आमच्यासाठी खुप महत्वाचा विषय बनला आहे. आमची शेतकऱ्यांची उपजिवीका ही मन्याड धरणावरच अवलबूंन आहे. त्याकामी मन्याड धरणात पाणी साठा व्हावा, कारण मन्याड धरण म्हणजे ३० ते ३५ गावातील शेतकऱ्यांचा व शेतकरी कामागार वर्गाचा अत्यंत जीवन मरणाचा प्रश्न आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना न्याय व हक्क मिळावा यासाठी मी आमरण उपोषणास बसणार आहे.
मन्याड धरणाच्या मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे
गिरणा मन्याड नदी जोड प्रकल्प करुन मन्याड धरणात पाणी टाकणे,
गिरणा धरण पावसाळ्यात फुल भरल्यानंतर ओव्हर फ्लो होणारे पाणी मन्याड
धरणामध्ये टाकणे,
रोटेशन पध्दतीने पाणी मन्याड धरणात टाकण्यात यावे,
मन्याड धरणाची उंची वाढवणे,
कॅनॉलची दुरुस्ती करणे, तसेच
शेतकरी संबंधीत मागण्या पुढीलप्रमाणे
कापसाला १५ हजार रुपये भाव मिळण्यात यावा,
चाळीसगांव तालुका दुष्काळ जाहीर झाला असुन तरी शेतकऱ्यास कुठल्याही
प्रकारच्या सवलती लागू नाही त्या त्वरित लागू कराव्यात,
शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा १२ तास वीज पुरवठा मिळावा,जळालेला ट्रान्सफार्मर (डि.पी.) दोन दिवसात बदलवुन मिळावी,
भाजीपाला व फळे यांची आडत व कट्टी बंद असतांनाही आडत व कट्टी घेणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी,
शेतकऱ्यांच्या मुख्य पिकांना योग्य भाव देणे,
दुधाला योग्य भाव मिळावा,
रासायनिक खतांची व बि-बियाणांची दरवाढ कमी करणे,
शेतकऱ्यांना फवारणी यंत्र, चारा कुट्टीयंत्र १०० टक्के अनुदानाने मिळावे,
शेतीवर अवलंबुन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना योग्य त्या सुविधा शासनाकडुन मिळाव्यात. उदा. कोयता, नांगर, बखर, विळा इ. अशा प्रकारच्या मागण्यांसाठी मी दिनांक ०७/०३/२०२४ बार गुरुवार शिरसगांव (भवानी माता मंदिरा जवळ) येथे आमरण उपोषणास बसणार आहे.
रोजी तरी महोदय, शासनाने दि. ०६९/०३/२०२४ तारखेपर्यंत दखल घेवुन मागण्या मान्य कराव्यात अन्यथा मी दि. १७/०३/२०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता शिरसगांव येथे मुदत अमरण उपोषणास बसणार आहे. माझ्या जिवाचे जर काही बरे वाईट झाले व इतर होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील याची शासनाने दखल घ्यावी ही विनंती.