मुंबई,(प्रतिनिधी)- मनोज जरांगे पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागत गंभीर आरोप केले असून जरांगे फडणवीसांच्या ‘सागर’ या शासकीय बंगल्यावर जाण्यास निघाले आहेत दरम्यान भाजपा आमदार प्रसाद लाड, आमदार नितेश राणे यांनी जरांगे यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिउत्तर देत हल्लाबोल केला आहे.मनोज जरांगेच्या भूमिकेवर सत्ताधारी नेत्यांनी आक्षेप घेतला असून ‘देवेंद्र फडणवीस के सन्मान मे भाजपा मैदान मे’ असंच काहीसं चित्र राज्यात पाहायला मिळत असून राज्यातील राजकारण चांगलचं तापणार असं दिसत आहे. उद्या राज्याचे अंतरीम अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत असून अधिवेशनातही याविषयी पडसाद उमटण्याची चिन्ह आहे.
आमदार प्रसाद लाड बोलतांना म्हणाले की,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मराठा समाजावर अनंत उपकार आहेत. मनोज जरांगे यांनी त्यांची नौटंकी आता बंद करावी. त्यांचा बोलवता धनी कोण आहे? हे त्यांनी आता जाहीर करावे. त्यांच्या मागे सिल्व्हर ओक आहे की जालना जिल्ह्यातील भैया कुटुंब ?”असं भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.
समाजाच्या नावाखाली स्वतःचा राजकीय वरदहस्त करण्याचा प्रयत्न जरांगे करत आहेत.त्याचा मागचा बोलविता धनी कोण हे त्यांनी सांगावे. तसेच त्यांनी फडणवीस यांचे नाव घेऊ नये अशीही वॉर्निंग देखील प्रसाद लाड यांनी दिली
पहिल्यांदाचं थेट देवेंद्र फडणवीसांचं नावं घेऊन मनोज जरांगेंचे गंभीर आरोप
धक्कादायक ; ‘सगेसोयरे’ संबंधी निर्णयासाठी चालढकलपणा ; १९ वर्षीय युवकाची आत्महत्या
मनोज जरांगेच्या भूमिकेवर सत्ताधारी नेत्यांनी आक्षेप घेतला.मनोज जरांगे यांचा बोलावता धनी कोण आहे, हे पाहण्याची गरज असल्याचे आमदार नितेश राणे म्हणाले आहेत.जरांगे यांच्या भूमिकेवर भाजप आमदार नितेश राणे म्हणाले की, मनोज जरांगेना बोलण्यासाठी कोणाकडून स्क्रिप्ट लिहून येते, ते लवकरच कळेल.सागर बंगल्यापर्यंत पोहचण्याअगोदर एक भिंत म्हणून आम्ही पण तिथे उभे आहोत.पहिली आमची भिंत पार करा, मग सागर बंगल्यापर्यंत पोहचण्याचा विचार करा असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.