मराठा आंदोलनाचे शस्र उपसून आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी आज महत्त्वाची आणि निर्णायक बैठक बोलावली होती.या बैठकीतून मनोज जरांगे यांनी पहिल्यांदाच थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन गंभीर आरोप केले असून मराठ्यांना आरक्षण मिळु नये म्हणून यामागे एकेरी उल्लेख करीत एकटा देवेंद्र फडणवीस आल्याचं म्हटलं आहे,सलाईनमधून मला विष देण्याचा प्रयत्न केल्याचाही गंभीर आरोप त्यांनी यावेळी केल्याने खळबळ उडाली.
बैठीत मनोज जरांगे पाटील अचानक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले मी सागर बंगल्यावर येतो. मी आता येतो सागर बंगल्यावर तुम्हाला माझा बळी घ्या पण खोटे आरोप करू नका, असं म्हणत मनोज जरांगे उठून जाऊ लागले त्यावेळी जमलेल्या मराठा समाजाने त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला आहे, यावेळी बैठकीत चांगलाच गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले.जमलेला मराठा समाज त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते, मात्र ते शांत होत नव्हते.
मी सागर बंगल्यावर येतो, घ्या माझा बळी असं म्हणत जरांगे पाटील म्हणाले. यानंतर ते स्टेजवरून जाण्यासाठी उठून निघाले होते. तेवढ्यात समाज बांधवानी त्यांना रोखलं.उपोषणामुळे जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली आहे. जरांगेंना श्वास घेताना त्रास होत होता. मात्र तरीही ते आक्रमकपणे बोलत असताना दिसले. तब्येत बिघडेल तुम्ही शांत व्हा अशी विनंती उपस्थित असलेले मराठा बांधव करत होते.
मला मारण्याचा प्रयत्न होत आहे. मी सागर बंगल्यावर येतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला मारुन दाखवावं, असे थेट आव्हान मनोज जरांगे यांनी केले आहे. सगळ्यामागे फडणवीस असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
छत्रपतींची शपथ घेऊन सांगतो मी कोणत्याही पक्षाचा नाही, कोणत्याही पक्षाकडून मला मदत मिळत नाही. मी कोणत्या पक्षाचा नाही मी फक्त माझ्या समाजाचा आहे. मराठ्यांना संपवण्याचा डाव आहे. यात देवेंद्र फडणवीस यांचा हात आहे हे मी इथे स्पष्ट सांगतो. मराठ्यांना-मराठ्यांच्या हातूनच हरवण्याचा त्यांचा डाव आहे, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.