जळगाव,(प्रतिनिधी)- प्रवासातील भेटीनंतर ओळख वाढवून जळगाव येथील महिलेवर अत्याचार केल्या प्रकरणी रेल्वे पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या रेल्वे पोलिसाकडून महिलेला मारहाण व बदनामी करण्याची सतत धमकी दिल्या जात असल्याची महिलेची तक्रार आहे.
सविस्तर असे की रेल्वे प्रवासादरम्यानओळख झाल्याने विश्वास संपादन करीत जळगावातील महिलेवर वेळोवेळी अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. महिलेने विरोध केल्यानंतरही फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार करणाऱ्या दिनेश पांडुरंग चौधरी (रा. सानपाडा) या रेल्वे पोलिसाविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक महिला रेल्वेने मुंबईला जात असताना तिची दिनेश चौधरी याच्याशी ओळख झाली.या ओळखीतून त्याने संपर्क वाढवला व महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने या महिलेसोबत शारीरिक संबंध केले.१ एप्रिल २०२३ ते १६ डिसेंबर २०२३ या दरम्यान तो वेळोवळी जळगावला आला व त्याने महिलेच्या घरी केला. जाऊन तिच्यावर अत्याचार केला.
या प्रकाराला महिलेने विरोध केला असता तिला मारहाण केली व फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.तसेच तुझ्या सर्व नातेवाइकांना या विषयी सांगेल, अशी धमकी देत शारीरिक संबंध ठेवले.या प्रकाराला कंटाळून महिलेने रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दिनेश चौधरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि प्रदीप बोरुडे करीत आहेत.