बुलढाणा,(प्रतिनिधी)- शिवजयंतीनिमित्त एका स्थानिक वाहिनीला मुलाखत देताना ३७ वर्षांपूर्वी १९८७ मध्ये वाघाची शिकार केली होती त्या वाघाचाचं ‘दात’ आपण घातला असल्याचं वक्तव्य आमदार संजय गायकवाड यांनी केले होते, या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता त्यानंतर त्याची वनविभागाने गंभीर दखल घेत गायकवाड यांच्याविरुद्ध शनिवारी वनगुन्हा दाखल केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं होता या व्हिडिओत त्यांनी गेल्या ३७ वर्षांपूर्वी वाघाची शिकार केली आणि त्याच वाघाचा दात माझ्या गळ्यात असल्याचे त्यांनी दावा केला आहे.हा व्हिडीओ शिवजयंतीच्या कार्यक्रमातील दिसत आहे.दरम्यान आमदारांच्या या दाव्यानंतर वनविभागाने गुन्हा दाखल करत दात प्रयोगशाळेत पुढील तपासणीसाठी पाठवला आहे.
वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ लागू झाल्यानंतर अधिकृतपणे बंदी घालण्यात आली. भारतात वाघांच्या शिकारीवर १९८७ पूर्वीच बंदी घालण्यात आली. वन्यजीव (संरक्षण) कायदा १९७२ मध्ये वाघांना आययूसीएनच्या धोक्यात आलेल्या प्रजातींच्या लाल यादीत संकटग्रस्त म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे.
1987 ला मी वाघाची शिकार केली. तो दात माझ्या गळ्यात आहे"आमदार संजय गायकवाड यांची शिवजयंतीच्या कार्यक्रमात धक्कादायक कबुली#Sanjaygaikwad #Viralvideo #Saamanaonline pic.twitter.com/ssn4u0izdp
— Saamana (@SaamanaOnline) February 22, 2024
१९७२ मध्ये वन्यजीव (संरक्षण) कायदा लागू झाल्यानंतरच वाघांच्या शिकारीवर अधिकृत बंदी लागू झाली. वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ च्या अनुसूची १ अंतर्गत भारतीय वाघाचे वर्गीकरण करण्यात आले. हा कायदा वाघांची शिकार, शिकार आणि वाघाची कातडी, हाडे आणि शरीराच्या अवयवांच्या व्यापारापासून संरक्षण प्रदान करतो. अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांना पहिल्यांदा दोषी ठरल्यास तीन ते सात वर्षांचा तुरुंगवास आणि पन्नास हजार रुपयांपासून दोन लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. त्यानंतर दोषी आढळल्यास किमान सात वर्षांचा तुरुंगवास आणि पाच लाख रुपयांपासून पन्नास लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.
या व्हिडिओने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये गायकवाड यांनी गळ्यात एका जनावराचा दात घातल्याचे दिसत आहे. या दाताबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले की, हा दात वाघाचा आहे. मी १९८७ मध्ये एका वाघाची शिकार केली होती. त्याच वाघाचा हा दात आहे. हा व्हिडिओ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशीचा असल्याचे बोलले जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाचा मुखपत्र असलेल्या ‘सामना’ च्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.