पाचोरा,(प्रतिनिधी)- अवैध वाळू वाहतुकीवरून सरकारी कर्मचाऱ्यांना धमकावणे, प्राणघातक हल्ला करणे, त्यांचा पाठलाग करत त्याच्यावर वॉच ठेवण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढतचं आहे,काही दिवसांपूर्वीच नशिराबाद जवळ रात्रीच्या वेळेला वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचा पाठलाग केला आणि कारवाई केली म्हणून थेट उपजिल्हाधिकारी व त्यांच्या पथकावर प्राणघातक हल्ला केला होता ही घटना ताजी असतांनाचं पाचोऱ्यात तलाठी यांच्या घरी जाऊन धमाकावल्या प्रकरणी वाळू माफियाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहिती नुसार, अवैध वाळू वाहतुकीवरून गुन्हा दाखल केल्याने पाचोरा शहर तलाठ्याच्या घरावर वाळू माफियांनी हल्ला केला. याबाबत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना भवरलाल नगरात २० रोजी रात्री ११:३० वाजता घडली होती.याप्रकरणी पाचोरा शहर तलाठी रामचंद्र दशरथ पाटील (आर. डी. पाटील) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हर्षल विठ्ठल पाटील (लकी पाटील) आणि दीपक पाटील (सर्व रा. पाचोरा) हे तलाठी पाटील यांच्या घरावर चालून आले, जिन्याजवळ येऊन शिवीगाळ करीत त्यांनी ‘वाळू चोरीचा गुन्हा का नोंदविला’ अशी विचारणा करीत त्यांना शिवीगाळ केली व मारहाण करण्याच्या उद्देशाने वाळू माफिया घरी आले होते, असे पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत वरील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.