जळगाव,(प्रतिनिधी)- धरणगाव तालुक्यातील सोनवद बु.येथे अंगणवाडी मदतनीस पदाकारिता पात्र असूनही निव्वळ CDPO यांनी मध्यस्थी मार्फत दीड ते दोन लाख रुपयाची केलेली मागणी पूर्ण करू न शकल्याने नियुक्ती देण्यास डावललं असल्याचा गंभीर आरोप करत दिपाली विशाल ढाकणे या महिलेने जिल्हा परिषद समोर ४ दिवसा पासून आमरण उपोषण सुरु केले आहे.
आमरण उपोषणास बसलेल्या महिलेचे म्हणणे आहे की मी बारावी पास 80:33% उत्तीर्ण असुन मेरिट लिस्टमध्ये माझे नाव बसले आहे.
परंतु धरणगावचे C. D. P.O धनगर यांनी माझ्याकडे मध्यस्थीच्या माध्यमातून दीड ते दोन लाख रुपयांची मागणी केलेली होती.माझी मदतनीस या पदाकरीता नेमणूक होणार आहे असे सांगून आश्वासन देण्यात आले होते.परंतु माझी आर्थीक परिस्थिती जेम, तेम सर्वसाधारण आहे माझे पती, मी माझा मुलगा सोनवद बु.या गावात भाडयाने राहतो. मी CDPO यांना फक्त 20 हजार रु. देण्यास तयार होते परंतु एका रात्रीतून तिसऱ्या क्रमांकाची बाई- योगीता मयूर भोई या बाईकडे फक्त विवाह प्रमाणपत्र व्यतीरिक्त एकही पुराव सोनवद गावाचा नसतांना तिला ५ महिन्यापासून अंगणवाडी मदतनीस या पहाची नियुक्ती देण्यात आलेली आहे.संबंधित अधिकारी यांनी संगंनमताने मी एससी असल्याने जातीय द्वेषातून व आर्थिक पूर्तता न केल्याने माझ्या ऐवजी दुसऱ्या उमेदवाराची बेकायदेशीर नियुक्ती केली आहे यामुळे माझ्यावर अन्याय झाला आहे.
मी या गावाची कायमची रहीवाशी मी सोनवद बु. या असून याबाबतचे १००% पुरावे माझे सोनवद बु गावाचेच असल्याबाबत सादर केले आहेत. न्याय मिळावीण्यासाठी मी जिल्हापरिषद कार्यालयाच्या चकरा मारीत आहे.दरम्यान सी.ई.ओ. कामावर हजर होण्याची आर्डर आम्ही देणार आहोत असे आश्वासन दिले होते मात्र त्यांनी देखील आज पावेतो असा नियुक्ती आदेश दिलेले नाही.
ठरावही खोटा केला
धरणगाव CDPO धनगर यांच्या सांगण्यावरून ग्रामसभेचा ठराव सरपंच, पोलीस पाटील, शुमसेवक, कृष्णा बोरनु पवार यांनी ११५ सहयांचे खोटे पुरावे घेवून जातीयतेच्या द्वेषातून केला आहे.न्याय न मिळाल्यास मी मागासवर्गीय आयोगाकडे तक्रार करणार असल्याचेही उपोषणकर्त्या दीपाली ढाकणे यांनी केले आहे.
दिपाली विशाल