जळगाव,(प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून नशिराबाद येथे दि.२५ रोजी ‘शिव जन्मापासून तर शिवराज्याभिषेक महानाट्याचे’ आयोजन करण्यात आले असून नशिराबाद येथील आठवडे बाजाराच्या मैदानावर सायंकाळी ६ वाजता या महानाट्याचा प्रयोग होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
शिव सह्याद्री प्रतिष्ठान नशिराबाद , अखिल भारतीय सकल मराठा समाज आणि मराठा पंच मंडळ नशिराबाद यांच्या संयुक्त विद्यमानाने महानाट्य संकल्पना आणि दिग्दर्शन शुभदा नेवे तर सादरकर्ते गणेश चव्हाण संस्थापक अध्यक्ष शिव सह्याद्री प्रतिष्ठान व अखिल भारतीय सकल मराठा समाज नशिराबाद श्री हेमंत मराठे अध्यक्ष मराठा पंच मंडळ श्री महेंद्र मराठे उपाध्यक्ष मराठा पंच मंडळ विशेष मार्गदर्शन डॉ श्री प्रमोद आमोदकर श्री बापू दादा शिंदे सौ सोनाली गणेश चव्हाण प्रेरणा -शिवरत्न तसे शिवचरित्राचे गाढे अभ्यासक दादा नेवे या कार्यक्रमास अध्यक्ष श्री सोमनाथ मराठे अध्यक्ष मराठा समाज जळगाव नगरसेवक व उपसभापती नगर नियोजन समिती सुरत तसेच सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक औद्योगिक राजकीय यासह विविध क्षेत्रातील तसेच विशेष प्रशासकीय अधिकारी अशा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
या महानाट्यात शिव जन्मोत्सव, बालपण ,तरुण पण, राजेंचे कार्य व कामगिरी तसेच राजेंचे कारकिर्दीतील थोरपण व महानपण, शिवराज्याभिषेक गीत , संगीत, पोवाडा, नाट्य, नृत्य असे विविध कार्यक्रम होणार असून यात जवळपास 148 स्थानिक व जळगांवच्या कलाकारांनी सहभाग घेतला आहे.या कार्यक्रमांमध्ये शहरातील व परिसरातील सर्व स्त्री पुरुष, तरुणांना , विद्यार्थ्यांना , नागरिकांना या कार्यक्रमात सहभागी होता यावे यासाठी रविवार हा सुट्टीचा दिवस निवडून वार व वेळाचे देखील नियोजन केले गेले आहे.