मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा आज पहाटे दि.23 रोजी 3:02 मिनिटांनी उपचारादरम्यान निधन झाले.त्यांना बुधवारी 21 फेब्रुवारी रोजी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने ते आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या निगराणी खाली त्यांच्यावर उपचार सुरु होते. दरम्यान त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला.
1995 सालच्या युतीची सत्ता असतांना मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी यांनी जबाबदारी पार पाडली.माजी मुख्यमंत्री असलेले मनोहर जोशी हे मूळचे बीडचे आहेत. त्यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 मध्ये रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. मनोहर जोशी यांचं वय 86 आहेत. शिक्षणाच्या निमित्ताने ते मुंबईत स्थलांतरित झाले आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना मुंबई महानगरपालिकेत अधिकाऱ्याची नोकरी मिळाली.
त्यानंतर ते मुंबईत स्थायिक झाले. काही काळानंतर त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत काम करण्यास सुरुवात केली. शिवसेनेकडून विधानपरिषदेवर निवडून येत त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द सुरु केली होती. 1976 ते 1977 या काळात ते मुंबईचे महापौरही झाले. 1995 साली राज्यात जेव्हा युतीची सत्ता आली, त्यावेळी मनोहर जोशी यांच्याकडे राज्याचे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.
मात्र आता वय आणि प्रकृतीच्या कारणामुळे ते मागील काही काळापासून राजकारणात सक्रिय नाही. त्यांनी मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषदेचे सदस्य, आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य अशा विविध पदांवर काम केले आहे.