मुंबई : मे.सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी नंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाला तुतारीवाला माणुस हे चिन्ह मिळालेलं आहे. केंद्रीय निवडणुक आयोगाने त्यांना हे चिन्ह दिलेलं असून शरद पवार गट आता येत्या निवडणुकीत या चिन्हावर निवडणुक लढवणार आहे.याआधी केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असं नाव दिलं होतं. आता शरद पवार गटाला चिन्हही बहाल करण्यात आले आहे.
"एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगने
दीर्घ जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजलागुनी!"“महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच 'तुतारी' आज निवडणूक चिन्ह… pic.twitter.com/LsgvjlWzuN
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) February 22, 2024
त्यानंतर शरद पवार गटाने आपल्या अधिकृत x हॅण्डलवर यासंबधी माहिती दिले आहे. त्यात त्यांनी ‘एक तुतारी द्या मज आणुनी’ ह्या केशवसुतांच्या कवितेतील ओळी लिहून पोस्ट शेअर केली आहे. तसेच शरद पवार गटाला हे चिन्ह मिळाल्याने त्यांनी गौरवास्पद बाब असल्याचे ही सांगितले आहे.