जळगाव,(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील तापी प्रकल्पासाठी भूसंपादन एस. एस केलेल्या शेतकऱ्यांना मिळालेल्या पैश्याच्या कमिशनवरून वादाच्या कारणावरून माध्यमात वृत्त आल्याने शिवीगाळ करून धमकी दिल्या प्रकरणी वकिलाविरुध्द जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. शालीग्राम साहेबराव सोनवणे (वय ६७) या शेतकऱ्याने अॅड. किशोर बाबुराव पाटील (रा. मोहाडी रोड, नेहरुनगर) यांच्या विरुद्ध तक्रार केली आहे.
१५ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात भूसंपादनाच्या पैशांतून कमिशन देण्यावरून वाद झाला होता. त्याबाबत माध्यमात वकीलाचे नाव आल्याने सोनवणे यांना शिवीगाळ करून धमकी दिल्याची पोलिस ठाण्यात फिर्याद दिली त्यावरून भादंवि कलम ५०४, ५०६ अन्वये जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.