भुसावळ– छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमीत्त भुसावळ आणि बोदवड तालुक्यात शिव उत्सव समिती आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने भाजपाच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा डॉ. केतकी पाटील यांनी रात्री १२ वाजता उपस्थिती लावून शिवछत्रपतींची आरती आणि वंदना केली.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमीत्त भुसावळ, बोदवड, नांदुरा तालुक्यात आयोजित शिवजयंती उत्सवांना भाजपाच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकी पाटील यांनी उपस्थिती दिली.
भुसावळ तालुक्यातील उत्सवात १४ गावातून तरुणांनी मशालयात्रा काढली होती. ही सळसळती तरुणाई शिवछत्रपतींच्या जयघोषात तल्लीन झाली होती. यावेळी भुसावळ आणि परिसरातील जवळपास ३००० तरुण यावेळी उपस्थित होते. शिवरायांच्या जयघोषाने परिसर दुमदुमला.बोदवड येथे अभिवादनशिवजयंती निमित्ताने बोदवड शहरातील जिजाऊ उद्यान व शिवव्दार येथे डॉ. केतकी पाटील यांनी राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. याप्रसंगी ज्येष्ठ नगरसेवक विजय बडगुजर, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सटाले, भाजपा जिल्हा चिटणीस परमेश्वर टिकारे, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अक्षय चौधरी, भाजयुमोचे शहर सरचिटणीस वैभव माटे, भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष आकाश महाजन, सुरज पाटील, शिवजयंती समितीचे उपाध्यक्ष अनिल देवकर, संजय काकडे तालुका सरचिटणीस पंकज डि.के, निरंजन चंदनकर, संजय पाटील, पंकज कोतवाल, गोपाल पाटील, चेतन तांगडे, आदी उपस्थित होते.येवती येथे शिवजयंतीचा जल्लोषबोदवड तालुक्यातील येवती येथे आयोजीत शिवजयंती महोत्सवात डॉ. केतकी पाटील यांनी सहभागी होत शिवजन्मोत्सवानिमीत्त शिवभक्तांसमवेत अभिवादन केले. यावेळी ज्येष्ठ मधुकर सदाशिवराव पाटील, भाजपा जिल्हा चिटणीस परमेश्वर टिकारे, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष उमेश पाटील, भाजपा तालुका सरचिटणीस पंकज डीजे, चेतन तांगडे, वैभव माटे (युवा मोर्चा शहर सरचिटणीस) यश महाजन (तालुकाध्यक्ष ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष) ग्रामपंचायत सदस्य योगेश कांदिले, योगेश मनुरकर, अक्षय ध्यार, गोकुळ ध्यार, सौरभ महाजन, कल्पेश सावळे, ऋषी माळी, देवा महाजन, वैभव जंगले, आशिष सोनवणे, गणेश सोनवणे, उमेश पाटील, ईश्वर माळी, दिनेश माळी, संजय माळी, सार्थक माळी, वैभव सजगले, बाळू वाघ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.आलमपुरा येथील मिरवणुकीत सहभागी नांदुरा तालुक्यातील आलमपुरा येथे आयोजित शिवजयंती उत्सवात डॉक्टर केतकी पाटील यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला याप्रसंगी पारंपारिक वेशभूषेत तयार होऊन आलेल्या चिमुकल्या समवेत सेल्फी देखील काढून त्यांचा आनंद द्विगुणित केला.