मुक्ताईनगर– संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनां अंतर्गत
समाजातील अंध, अपंग, विधवा, परितक्ता, निराधार व्यक्तींना चरितार्थ चालवण्यासाठी आधार म्हणून शासनातर्फे दरमहा मानधन (वेतन)दिले जाते
परंतु गेले पाच महिन्यां पासुन या योजनांच्या लाभार्थ्यांना मानधन मिळाले नसल्याने त्यांच्यासमोर चरितार्थ कसा चालवावा असा प्रश्न निर्माण झाला असुन त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे हि कैफियत लाभार्थ्यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्याकडे मांडली त्यावर प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी आणि या योजनांच्या लाभार्थ्यांना सोबत घेऊन मुक्ताईनगर तहसील कार्यालय गाठून प्रशासनाला याबाबत जाब विचारला
व लवकरात लवकर लाभार्थ्यांना मानधन (वेतन )वितरित करावे अन्यथा आगामी काळात पक्षा तर्फे आंदोलन करण्याचा इशारा दिला
यावेळी प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे म्हणाल्या संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना मार्फत वृद्ध निराधार अपंग विधवा परितक्ता यांना उदरनिर्वाह करण्यासाठी दरमहा शासना तर्फे मानधन (वेतन)दिले जाते परंतु गेले पाच महिन्या पासून या योजनेच्या लाभार्थ्यांना हे वेतन मिळाले नसल्याने त्यांना उदरनिर्वाह कसा करायचा, वृद्धांनी औषधपाणी दवाखान्याच्या खर्च कसा भागवायचा असा प्रश्न उभा ठाकला असून त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे
राज्य केंद्र शासन एकीकडे कोट्यवधी रुपये जाहिरातींवर खर्च करून विविध योजनांचा गाजावाजा करत आहे परंतु यातील अर्ध्या योजना फक्त कागदावर असुन त्यांची योग्य प्रकारे अंमलबजावणी होत नाही
संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनांचे लाभार्थी गरीब ,गरजु असून सुद्धा शासन त्यांचे मानधन, वेतन देण्यास पाच पाच महिने विलंब करते आहे यातून जाहिरात बाज सरकारचे अपयश दिसून येते
सरकारने लवकरात लवकर या योजनांच्या लाभार्थ्यांना त्यांचे मानधन(वेतन )त्यांच्या खात्यात जमा करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रोहिणी खडसे यांनी केली अन्यथा पक्षा तर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला
यावर नायब तहसीलदार माकोडे यांनी आठवडा भरात या योजनांच्या लाभार्थ्यांच्या खात्यात त्यांचे मानधन(वेतन)जमा करण्यात येईल असे आश्वासन दिले
यावेळी माजी सभापती निवृत्ती पाटील,शहराध्यक्ष राजेंद्र माळी, युवक शहराध्यक्ष बबलू सापधरे,हरिष ससाणे,प्रविण कांडेलकर,बाळा भालशंकर,सुनिल पाटील,अतुल पाटील, विकास पाटील, रउफ खान, विनोद काटे, संजय कपले,संदीप जावळे,हाशम शाह, अय्याज पटेल आसिफ पेंटर,जुबेर अलीप्रभाकर झोपे
यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी आणि योजनांचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते