जळगाव दि.17 ( प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जळगाव जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त “जाणता राजा ” या महानाट्याचे आयोजन जळगाव जिल्ह्यातील शिवप्रेमी रसिकांसाठी करण्यात आलं असून छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पूर्वसंध्येपासून दिनांक 18, 19 आणि 20 फेब्रुवारी 2024 असे तीन दिवस दररोज सायं. 6.00 वा. जळगाव शहरातील पोलीस कवायत मैदानावर हे महानाट्य सादर होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम व शौर्य अनुभवण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील शिवप्रेमी नागरिकांनी हे नाट्य पाहायला यावे असे आवाहन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
या महानाट्याच्या आयोजनातून छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि जीवन सर्वांना पाहता येणार आहे. हे महानाट्य रसिकांसाठी विनामुल्य आयोजित करण्यात आले आहे. महानाटयाच्या पासेस महानगरपालिका, नगरपालिका, तहसील कार्यालय आणि पंचायत समिती कार्यालयात शासनाच्या वतीने उपलब्ध करून दिलेल्या आहेत. याचा लाभ रसिकांनी घ्यावा असेही आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेले आहे.
0000