मुंबई : लोकसभा निवडणुका तोंडावर असतांना राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.भारतीय जनता पक्षात दिग्गज नेते पक्ष प्रवेश करत असून दररोज राज्यभरात मोठ्या इन्कमिंग सुरु आहे दरम्यान आज मंगळवार रोजी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आगे आगे देखो होता क्या? असं सूचक विधान करून राज्यातील अजून दिग्गज नेते भाजपात येतील असचं चित्र दिसत असून राज्याच्या राजकारणात आणखी राजकीय भूकंप होतील हे मात्र खरं असलं तरी काँग्रेस मात्र सतर्क झाल्याचे समजते.
काँगेस पक्षाचे तीन आमदार भाजपाच्या वाटेवर?
काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला धक्का देत भाजपात दाखल झाल्यानंतर नांदेडमधील देगलूर विधानसभेचे आमदार जितेश अंतारपूरकर, नांदेड दक्षिण विधानसभेचे आमदार मोहनराव हंबर्डे, हदगावचे आमदार माधवराव पाटील हे आमदार पक्षाचा राजीनामा देण्याची शक्यता असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान काँग्रेस पक्षाला राज्यात मोठा दगा फटका बसू नये म्हणून काँग्रेस पक्ष सतर्क झाल्याचेही समजते.
काँग्रेस सतर्क…
अशोक चव्हाण यांच्या भाजपा पक्ष प्रवेशानंतर काँग्रेस हायकमांडनं प्रदेश काँग्रेसला बैठक घेण्याचे निर्देश दिल्याचे समजते, चव्हाणांसोबत आणखी किती नेते, आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत याचा वेध या बैठकीत घेण्यात येईल.काँग्रेसला आपला पक्ष कसा दगा फटक्या पासून वाचवतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.