जळगाव,(प्रतिनिधी)- राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मनुष्यबळ सेवे अंतर्गत 5200 पदे भरण्यासाठी मे. सैनिक इंटिलिजेन्स सिक्युरिटी प्रा. ली. कंपनीला कंत्राट देण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व आयुष, महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालयाकडून बेकायदेशीर पत्र काढलेले आदेश रद्द करा या मागणीसाठी समता सैनिक दलाचे राज्य संघटक विजय निकम यांनी आज जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की,
बाह्ययंत्रणेकडून कामे करून घेण्यासाठी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचा असलेला सेवापुरवठादार संस्थेचे / एजन्सीचे पॅनल नियुक्तीचा दिनांक 6/9/2023 रोजीचा शासन निर्णय दिनांक 31 ऑक्टोबर रोजी शासनाने रद्द केला असतांना आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व आयुष, महाराष्ट्र राज्य, मुंबई विभागाकडून दिनांक 17/11/2023 रोजी पत्रानुसार शासनाने रद्द केलेल्या पॅनल मधील मे. सैनिक इंटिलिजेन्स सिक्युरिटी प्रा. ली. कंपनीला 5200 पदे कंत्राटी पद्धतीने भराण्याचे काम देण्यासाठी बेकायदेशीर पत्र काढले आहे.तरी सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होऊन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात अन्यथा संघटनेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल असा इशारा विजय निकम यांनी दिला आहे.यावेळी निवेदन देतांना संजय सपकाळे, सुधीर संदनशिव, राजेंद्र निकम, भाईदास पाटील, भैयासाहेब निकम,विकी बाविस्कर, सुकदेव सपकाळे,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.