मुंबई – काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज आपल्या आमदारकीचा व काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने राज्याच्या राजकारणात भूकंप झाला असून अशोक चव्हाण येत्या दोन दिवसात भाजपा पक्षात प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, मी दिनांक 12/02/2024 च्या मध्यान्हापासून माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सादर करत आहे.
पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं पत्र अशोक चव्हाणांनी ज्या लेटरहेडवर लिहिलंय, त्या लेटरहेडवरील ‘विधानसभा सदस्य’ या शब्दांपुढे ‘माजी’ असे पेनाने लिहिलं होतं.त्यानंतर ट्वीट करून त्यांनी स्पष्टही केलं की, भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दिला आहे.