जळगाव,(प्रतिनिधी)- सामाजिक कार्यकर्ते तथा व्यवसायिक प्रशिक्षक जयंत हिरालाल पाटील यांची नुकतीच लोक संघर्ष मोर्चा संघटनेच्या जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी निवड झालेली असून संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष माननीय प्रतिभाताई शिंदे आणि संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अजय पाटील यांनी जयंत पाटील यांना नियुक्तीपत्र देऊन कार्यभार सोपवला.
श्री जयंत पाटील हे मराठा उद्योजक कक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष व रुलर चेंबर ऑफ कॉमर्स चे जिल्हाध्यक्ष असून ते ग्रामीण व शहरी भागातील गरजू, परीतक्त्या, एकल महिला यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी वेगवेगळ्या मोफत व्यवसायिक प्रशिक्षणाच्या व आर्थिक भांडवल उभारणीच्या माध्यमातून त्यांचे उद्योग उभारून देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करून देण्यासाठी कार्यरत आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेत लोक संघर्ष संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा माननीय प्रतिभाताई शिंदे व राज्य उपाध्यक्ष श्री अजय पाटील यांनी श्री जयंत हिरालाल पाटील यांची जिल्हा अध्यक्ष पदी निवड करुन त्यांना जळगाव जिल्ह्याचा कार्यभार सोपवलेला आहे यांच्या निवडीबद्दल संघटनेच्या वतीने जयंत पाटील यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होतं आहे