मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या अध्यादेशाची तात्काळ अमलबजावणी करावी या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीमध्ये सुरु केलेल्या अमरण उपोषणला आज तिसरा दिवस असून त्यांची प्रकृती खालवली आहे दरम्यान त्यांनी उपचार न घेण्यस नकार दिल्याने सरकारच टेन्शन वाढलं आहे.मनोज जरांगे यांनी या गेल्या तीन दिवसांत पाण्याचा थेंब देखील घेतला नाही. तसेच, उपचार घेण्यासाठी देखील जरांगे यांनी नकार दिला आहे. त्यामुळे कालपासून त्यांची तब्येत देखील खालावली आहे.
मराठा आरक्षणाची मागणी लावून धरणाऱ्या मनोज जरांगे यांनी गेल्या महिन्यात आपला मोर्चा थेट मुंबईकडे नेत सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडले होते.मात्र वाशीमध्येच त्यांचे आंदोलन थांबवत सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सगेसोयरेबाबत अध्यादेश काढला होता. सोबतच पंधरा दिवसांत या अध्यादेशाची अंमलबजावणी होण्याचं देखील आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र, पंधरा दिवस उलटून गेल्यावर देखील या अध्यादेशाची अंमलबजावणी होत नसल्याने मनोज जरांगे यांनी 10 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमध्ये अमरण उपोषण सुरू केले आहे.