मुंबई – आमदार अपात्रता प्रकरणी विधासभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकाला नंतर उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती त्यावर आज सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे
शिवसेनेतील फूटीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला. शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटातील आमदारांना राहुल नार्वेकर यांनी अपात्र ठरवले नाही. मात्र, शिवसेना पक्ष आणि धनुष्य बाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले.राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर ठाकरे गटाने आक्षेप घेत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.
विधिमंडळात असलेल्या बहुमताच्या आधारे शिवसेना पक्ष आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्यात आले. उद्धव ठाकरे यांची अध्यक्षपदी निवड झाल्याची नोंद शिवसेनेच्या मूळ घटनेत झाली नसल्याने शिवसेनेच्या मूळ घटनेनुसार हा निकला दिल्याचे राहुल नार्वेकर म्हणाले होते. आपल्या निकालात नार्वेकरांनी शिंदे गटाचे प्रदोत भरत गोगावले यांची निवड योग्य ठरवली तर, ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची निवड अवैध ठरवली. दोन्ही गटातील आमदारांना देखील अध्यक्षांना पात्र ठरवले.