जळगाव,(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याचे विभागाचे मंत्री h चंद्रकांत दादा पाटील यांना जळगाव शहर व ग्रामीण रेशन दुकानदार संघटनेच्या वतीने महाराष्ट्र शासनाकडून वितरित होणाऱ्या मोफत साड्या फक्त अंतर्गत कार्ड धारकांना न देता प्राधान्य कुटुंबाचे लाभ घेणारे लाभार्थी यांना सुद्धा मोफत साड्यांचा लाभ मिळावा अशा प्रकारचे निवेदन संघटनेच्या मार्फत दिनांक 9 फेब्रुवारी शुक्रवार रोजी देण्यात आले.
स्वस्त धान्य दुकानावर येणारे लाभार्थी मिळणाऱ्या मोफत अन्नधान्यामुळे खूप खुश आहे गरीब जनतेमध्ये एक प्रकारचा उत्साह आणि आनंदाचे वातावरण असताना शासनामार्फत मोफत साड्यांची योजना राबवण्यात येणार आहे ती फक्त अंतोदय लाभार्थ्यांना न देता प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना सुद्धा त्या योजनेचा लाभ मिळावा, कारण अंतोदय योजनेतील लाभार्थी खूप कमी प्रमाणात असल्याने जास्त प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी आहे त्यामुळे त्यांच्यात नाराजी पसरत असल्याने त्यांच्या वतीने म्हणजेच लाभार्थ्यांच्या वतीने संघटनेतर्फे सदरचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्रालयाचे मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील जळगाव जिल्ह्यात एका खाजगी दौऱ्यानिमित्त आलेल्या असताना देण्यात आले निवेदन देताना अध्यक्ष नितीन सपके, सुभाष शेठ जैन हिम्मत पाटील दिपकभाऊ परदेशी नरेंद्र आप्पा पाटील रवींद्र पाटील पी एस देशमुख डिगंबर मोरे हिमांशू तिवारी प्रदीप भावसार शैलेश कटारिया शब्बीर बोहरी नथू सोनवणे समाधान चौधरी अशपाक बागवान रमजान मुलतानी फिरोज पठाण श्रीकांत शोले बाळा महांगडे गणेश जोगी एस एल नाथ दिलीप चौधरी बाबू शेख किरण कोळी जयदीप शहा शैलेश परदेशी विनोद पांडे बबलू शेठ हिरालाल चौधरी मुरलीधर वाणी नारायण वाणी गोपाळ बारी परेश सपकाळे रवींद्र चौधरी अनिल कासार बी.टी.पाटील के.पी पाटील राहुल पाटील विजय निकम सुधीर संधांशीव अतुल हराळ व हेमरत्न काळुंखे आदी.