संगमनेर : एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर एकाने दोन वेळा शारीरिक अत्याचार केले. त्यातून मुलीला गर्भधारणा झाली होती गुरुवारी रुग्णालयात तिची प्रसूती होऊन तिने मुलीला जन्म दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या जबाबावरून अत्याचार करणाऱ्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागात तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. सुभाष दिलीप मेंगाळ (मूळ रा. खंडोबाची वाडी, घारगाव, सध्या रा. सावरगाव तळ, संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. पीडित मुलगी सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. गेल्या वर्षी २०२३ मध्ये पीडित मुलीच्या घराजवळ असलेल्या शेतात तिच्यावर दोनदा अत्याचार करण्यात आल्याची माहिती पीडित मुलीने दिली आहे.