ACB चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले शिवसेना उभाठा गटाचे आमदार राजन साळवी यांनी फेसबुक या सोशल मीडियावार एक भावनिक पोस्ट करून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आसन असलेल्या खुर्चीचे व त्यावर असलेल्या फोटोचे फोटो शेअर केले त्या सोबतच जानेवारी 2024 मध्ये एसीबीने राजन साळवी यांच्या निवासस्थानी छापा मारला होता. या छापेमारीमध्ये एसीबीने राजन साळवी यांच्या घरात झाडाझडती घेतली. यावेळी घरातील संपत्तीची मोजदाद केली होती त्याबाबतचा घरातील साधन संपत्ती,वस्तूंच्या किंमती दर्शविणारा एक पत्र देखील शेअर केलं आहे.
या पत्रात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आसन असलेली खुर्ची व त्यावर असलेल्या बाळासाहेबांचा फोटो ची किंमत दहा हजार ठरवल्याने आमदार राजन साळवी यांनी फेसबुकवर हे दुर्दैवी असल्याचं म्हणत अँटी करप्शनच्या कारवाई वरुन सरकारवर निशाणा साधला. एसीबीने बाळासाहेब ठाकरेंची खुर्ची आणि फोटो फ्रेमची किंमत दहा हजार ठरवल्याचं कागदपत्रामध्ये दिसत आहे.
काय म्हटलंय आमदार राजन साळवी यांनी पोस्ट मध्ये
अँटी करप्शन (ACB) कडून माझा निष्ठतेचे मोल दुर्दैवी…
काही दिवसांपूर्वी माझा रत्नागिरी येथील राहत्या घरावर अँटी करप्शन (ACB) ने धाड टाकली त्यांना सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन केले. परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे ज्या आसनावर बसून हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांनी शिवसेना भवन, दादर येथे बसून शिवसेना चालवली, वाढवून आज जे राज्यकर्ते झालेत त्यांना नावारूपाला आणले त्यांच्या आदेशाने त्या माझा घरातील आसनांची किंमत ठरवावी दुर्दैवीच ना…..
हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांनी शिवसेना भवन, दादर येथे बसून शिवसेना महाराष्ट्र भर तळागाळापर्यंत रुजवली ते आसन मी हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांची आठवण म्हणून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे ह्यांच्या परवानगीने माझा निवासस्थानी नित्यपूजेसाठी आणले त्यावेळी माझा चिरंजीव अथर्व ह्याने हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या वरील निष्ठेने एक त्यांचे सुंदर चित्र रेखाटले माझी पत्नी अनुजा व मी त्या आसनांची नित्यनियमाने पूजा करतो परंतु दुर्दैवाची बाब माझा रत्नागिरी येथील राहत्या घरावर अँटी करप्शन (ACB) ने धाड टाकली व त्या आसनांची व फोटोची मी शिवसैनिक म्हणून अनमोल समजतो त्याची किंमत ठरवली खुप दुर्दैवी…….
https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0dmqxiiZnYK8bc6sQZEejvpmqfCd4Rb8BEUq8jMPCsb3S3vPLHHA5TsJXm1LD7exJl&id=100057838129509&mibextid=Nif5oz