मुंबई : शिंदे सरकारमधील राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ भाजपाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा असतांना सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया यांनी X (पूर्वीचे ट्विटर)वर ट्विट करून भुजबळ भाजपाच्या वाटेवर असल्याचा दावा केला आहे.सत्तेत असतांना त्यांनी सरकारवर वारंवार जाहीर नाराजी व्यक्त करून मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवरून आरक्षणाबाबत सरकारने घेतलेली भूमिका चुकीची ठरवत सरकारला घरचा आहेर दिला आहे.ओबीसींच्या आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण देऊ नका त्यांना वेगळं आरक्षण द्या अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली आहे दरम्यान आगामी काळात आरक्षणाच्या मुद्यावरून मोठा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.
शिंदे गट शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांनी भुजबळ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी केल्यानंतर वाद चिघळला आहे, दरम्यान छगन भुजबळ भाजपाच्या वाटेवर असल्याची पोस्ट सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया यांनी केल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होतांना दिसत आहे.या पोस्टमध्ये अंजली दमानिया यांनी लिहलं आहे की ,भुजबळ भाजपाच्या वाटेवर?, एकेकाळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजपा त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार? अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार, राजकारणासाठी? कुठे फेडाल हे पाप’ अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे.
भुजबळ भाजप च्या वाटेवर?
एके काळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार?
अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार, राजकारणासाठी?
कुठे फेडाल हे पाप
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) February 1, 2024