अमरावती,(प्रतिनिधी)- आधी युवतीला विश्वासात घेतले, गोड बोलून महाप्रसाद घेण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी घेऊन आला नंतर परत सोडून देण्याच्या बहाणा करतएका २३ वर्षीय युवतीला तिची इच्छा नसतांना जवळच्या शेतातील झोपडीत आळीपाळीने पाच जणांनी तिच्यावर रात्रभर सामूहिक अत्याचार केला, घटनेने चांगलीच खळबळ उडाली असून आरोपी पाचही जण अटकेत आहेत.
अमरावती जिल्ह्यातील मालखेड येथे सदर घटना घडली असून पीडितीला पाच जणांनीजबर मारहाण केली आहे.अत्याचार केल्या प्रकरणी वरुड तालुक्यातील शेंदूरजना घाट पोलिसांनी आरोपींविरुद्ध अपहरण आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी महेश वाघमारे (वय 25), पिंटू हरले (वय 39), रमेश भलावी (वय 40), इस्माईल खाँ (वय 65), नितीन ठाकरे (वय 25) अशी या पाच संशयित आरोपींची नावे आहेत.
पीडित युवतीच्या परिवारातील महेश वाघमारे हा पीडित तरुणीच्या कुटुंबीयांच्या परिचित आहे. त्यामुळे तो लाही (प्रसाद) करिता मालखेड येथे घेऊन जातो, असे तिच्या आईला सांगून तो तिला मालखेड येथे घेऊन गेला. त्यानंतर त्याने पीडितेला रात्रभर आपल्या घरी ठेवले. 28 जानेवारीला तो तरुणीला तिच्या मूळगावी सोडून देण्यासाठी निघाला. महेशने तिला दुचाकीवर बसवले. मात्र, गावी न जाता त्याने गाडी शेताच्या दिशेने गाडी नेत युवतीवर पाचही जणांनी अत्याचार केला. दरम्यान पोलिसांनी पाचही संशयित आरोपीनां अटक केली आहे. सदर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.