संकलन-किशोर रायसाकडा
सर्वप्रथम बऱ्याच दिवसानंतर सर्व वाचकांना माझा नमस्कार
खरंतर लिखाणाची खूप इच्छा असते परंतु वेळेअभावी लिहू शकत नाही.
माझा नेहमीच प्रयत्न असतो लिखान हे वास्तविकतेला धरून असाव…
आजच्या समाज मनाचा अभ्यास केल्यास नात्यांचा प्रवास हळूहळू भावनाहीन होत चालला आहे. त्यामुळे प्रचंड अस्वस्थता व त्यातून उद्भवणाऱ्या समस्या यांचे प्रमाण जास्त होत आहे काही काळ मागे गेले असता एकत्रित कुटुंबातील गोडवा प्रत्येकाने अनुभवला असेल अगदी छोटी छोटी घरे होती त्यात नऊ दहा लोक आनंदाने राहत असत.. परंतु आता समीकरणे सर्व बदलले आहेत सुरुवात बालपणापासून होते पूर्वी घरांमध्ये लहान मुलांना संस्कार द्यायला वडीलधारी मंडळी घरात असायची परंतु आत्ताच्या काळात दोन अडीच वर्षातच मुलांच्या डोक्यावर पुस्तकांची ओझे दिले जाते त्यामुळे सहाजिकच त्यांचे बालपण हरवते लहानपणापासूनच त्यांना स्पर्धा करायला शिकवले जाते त्यामुळे स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यासाठी बालपणातील खेळ आत्ताची मुलं विसरली आहेत विटी दांडू ची जागा आता मोबाईल आणि लॅपटॉप ने घेतली आहे त्यामुळे मानसिक आरोग्य सोबतच शारीरिक आरोग्य देखील धोक्यात आले आहे मुलांचा कसाबसा प्रवास हा दहावीपर्यंत फॅमिली सोबत होतो परंतु आता नवीनच फॅड निघाले आहे आठवी नववीला मुल असले की कुठेतरी बाहेर टाकण्याचा विषय सुरू होतो परंतु पालक या ठिकाणी विसरतात हे वय त्यांचे मानसिक आणि शारीरिक विकास करण्याचे वय असते या वयात मुलगी असो किंवा मुलगा आई वडील त्यांना जवळ हवे असतात परंतु अभ्यासाच्या प्रेशर मुळे मुलं त्यांच्या भावना घरात व्यक्त करू शकत नाही कारण भीती असते मनामध्ये की आपण बाहेर जायला नकार दिला तर आपल्या पुढील करियरवर परिणाम होईल अलीकडेच बातम्यांमध्ये वाचले एका सर्वेक्षणामध्ये 4 वर्ष ते 18 वर्ष वयोगटातील मुला मुलींमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण वाढले आहे असे का कारण त्यांच्या भावना त्यांना मोकळेपणे व्यक्त करता येत नाही आणि शारीरिक खेळांची कमतरता लहानपणापासूनच मुलांमध्ये आपल्या सोबत असणाऱ्या मित्र अथवा मैत्रिणीबरोबर तुलना करायला शिकवले जाते त्यातूनच निर्माण होतात द्वेष आणि मत्सर पर्यायी पुढे भावनाहीन व्यक्तिमत्व तयार होते…. याचा परिणाम प्रत्यक्षपणे आपल्या कुटुंबावर होतो हे आपण सोयीस्करपणे विसरतो अर्थातच आपण फक्त अर्थार्जण करणारी मशीन निर्माण करत आहोत.. त्यामुळे भावी पिढी आणि नाती हा प्रवास खूपच अवघड होण्याच्या मार्गावर आहे… परवाच सुबोध भावे यांचा “बंध नायलॉनचे” मराठी चित्रपट बघितला या चित्रपटाचे कथानक अतिशय सुरेख आहे परंतु ते बघताना कुठेतरी मनात भीती निर्माण झाली चित्रपटाच्या कथानकाबद्दल मी जास्त काही लिहीत नाही… परंतु इच्छा असल्यास तुम्ही बघू शकतात… आज मनुष्य पैसा कमावण्याच्या नादात आणि प्रॉपर्टी वाढवण्याच्या नादात इतका दंग झालेला आहे… स्वतःच्या आत भावना मरत आहेत हे सुद्धा लक्षात यायला त्याला वेळ नसतो. अलीकडीलच हॉटेल उद्योजक सिंघानिया यांचे उदाहरण सर्वांसमोर आहेत अशी उदाहरणे यापुढे सर्वसाधारण होतील ….. एकूणच काय भावना शून्य रोबोटिक पिढी निर्मितीला सुरुवात झाली आहे….. सध्या आपण सर्वच अलर्ट मोडवर आहोत so please be alert ????
सौ. ललिताताई पाटिल
मो नंबर 9922092896