Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नाराजी नंतर ‘या’ कारणासाठी महाविकास आघाडीत सामील होण्यास प्रकाश आंबेडकरांचा होकार!

najarkaid live by najarkaid live
January 31, 2024
in राज्य
0
नाराजी नंतर ‘या’ कारणासाठी महाविकास आघाडीत सामील होण्यास प्रकाश आंबेडकरांचा होकार!
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबई – महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईतील ट्रायडेंड हॉटेलमध्ये ३० रोजी वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर गेले असतांना त्यावेळी डॉ. पुंडकर यांनी बैठकीत आपला अजेंडा महाविकास आघाडीसमोर सादर केला. तेव्हा आम्ही चर्चा करून सांगतो असं म्हणून त्यांना १ तास बैठकी बाहेर बसवून ठेवण्यात आले आणि आतमध्ये MVA च्या तिघा पक्षांची बैठक सुरू होती.कालच्या बैठकीत मिळालेल्या वागणुकीबाबत डॉ. पुंडकर यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती दरम्यान वंचित आघाडीकडून देखील नाराजी व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान बैठकीनंतर महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश करण्यात आल्याचे पत्र खा. संजय राऊत यांनी जाहीर केले होते. त्यावर VBA चे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून होते,अखेर प्रकाश आंबेडकरांनी क्स वर ट्विट करून भाजप-आरएसएसचा पराभव करणे हे VBA चे प्राधान्य असल्याने महाविकास आघाडीत सामील होण्यास होकार दिला आहे.

आगामी महत्त्वाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha 2024 Polls) प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी (VBA) अधिकृतपणे महाविकास आघाडी (MVA) मध्ये सामील झाली आहे.प्रकाश आंबेडकरांच्या युतीत सामील होण्याच्या अनेक दिवसांच्या अटकळ आणि चर्चांनंतर आता अधिकृतरीत्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी X वर (पूर्वीचे ट्विटर) ही घोषणा केली. संजय राऊत यांनीही वंचीत बहुजन आघाडीचा आज महविकास आघाडीत समावेश झाल्याची माहिती  दिली आहे.

वंचीत मुळे देशातील हुकूमशाही विरोधी लढ्याला नक्कीच बळ मिळेल. भारताचे संविधान धोक्यात आहे त्यामुळे एकत्र येऊन संविधान वाचवावे लागेल, असे संजय राऊत म्हणाले. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि  नेते प्रकश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचा विदर्भ प्रदेशासह काही जिल्ह्यांमध्ये प्रभाव आहे. आज मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या सभेसाठी वंचित बहुजन आघाडीला अधिकृत निमंत्रणही देण्यात आले होते.

प्रकाश आंबेडकर यांना दिलेल्या पत्रात काय म्हटलं आहे

देश अत्यंत गंभीर परिस्थितीतून मार्गक्रमण करीत आहे. महान लोकशाही परंपरा असलेला देश हुकूमशाहीकडे जातो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला महान संविधान दिले. व्यक्ती स्वातंत्र्य व लोकशाहीचा पुरस्कार केला. आज हे सर्व पायदळी तुडवले जाते आहे. 2024 साली देशात झुंडशाहीने वेगळा निकाल लावला तर बहुदा ही शेवटचीच निवडणूक ठरेल, अशी शंका लोकांना वाटते. ही परिस्थिती बदलून राज्यात व देशात परिवर्तन घडवावे, यासाठी महाविकास आघाडी ची स्थापना झाली, हे आपण जाणताच.’

यामध्ये पुढे म्हटले आहे, ‘आपण स्वतः देशातील हुकूमशाही विरुद्ध लढत आहात. आम्ही त्याबद्दल आपले आभारी आहोत. वंचित बहुजन आघाडीने यापुढे अधिकृतपणे महाविकास आघाडीत सामिल व्हावे, अशी आमची भूमिका आहे. 30 जानेवारी रोजी मुंबई येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत आपल्या सुचनेनुसार, वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी सहभागी झाले. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत सामिल व्हावे, यावर शिवसेना, काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमत झाले असून, त्यानुसार वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश केला आहे.’

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात पुढील पाच दिवस अशी असेल थंडीची लाट

Next Post

एक प्रवास….. नात्यांचा… रेशीम बंध…ते…. नायलॉन बंध – लेखन ललिता पाटील

Related Posts

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

April 10, 2025
भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

April 9, 2025
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

April 9, 2025
धक्कादायक ;  ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

धक्कादायक ; ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

April 9, 2025

‘या’ दिवशी जन्मलेल्या राज्यांमधल्या मुलींच्या नावाने १० हजार रुपये बँकेत जमा होणार

April 2, 2025
धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

April 2, 2025
Next Post
एक प्रवास….. नात्यांचा… रेशीम बंध…ते…. नायलॉन बंध – लेखन ललिता पाटील

एक प्रवास..... नात्यांचा... रेशीम बंध...ते.... नायलॉन बंध - लेखन ललिता पाटील

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us