नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला आहे. तसेच भारतीय जनता पक्षाने त्यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपसोबत मिळून जेडीयू सरकार स्थापन करेल हे आता स्पष्ट झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून बिहारच्या राजकारणात उलथापालथीचे संकेत मिळाले होते. त्यानुसार आज मोठा बदल पाहायला मिळत आहे.