5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा सामना इंग्लंडशी होत आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंड संघाने दुसऱ्या डावात 6 गडी गमावून 316 धावा केल्या होत्या. सध्या इंग्लिश संघाची आघाडी 126 धावांची आहे. हैदराबादच्या खेळपट्टीवर चौथ्या डावातील एकूण सरासरी १३१ धावा आहे. या बाबतीत इंग्लंडचा संघ सध्या या सामन्यात आघाडीवर आहे. पण या सामन्यात टीम इंडिया थोडीशी पिछाडीवर पडली तर घाबरण्याची गरज नाही कारण हैदराबादची खेळपट्टी सध्या अपेक्षेपेक्षा वेगळी खेळत आहे.