जळगाव : जामनेर तालुक्यातील मोयखेडा येथील सरंपच पतीच्या मृत्यूप्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शमिभा पाटील, युवा अध्यक्ष बाळा पवार यांच्या नेतृत्वाखाली जामनेरहून निघालेला वंचित बहुजन आघाडीचा ‘आक्रोश मोर्चा’ रात्री ११:३० वाजता जळगावात दाखल झाला. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
सरपंच पती समाधान मेढे यांच्या मृत्यूप्रकरणी राजकीय दबावापोटी खूनाचा गुन्हा दाखल होत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार रात्री दहा वाजता कार्यलयात दाखल झाले.मात्र आंदोलकांनी जिल्हाधिकारी किंवा पोलीस अधीक्षक यांच्याशीचं चर्चा होईल अन्यथा हटणार नाही अशी भूमिका घेत आंदोलन सुरु ठेवले होते.कार्यालयाबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात असताना मुख्यद्वार बंद करण्यात आले होते.