पाचोरा,(प्रतिनिधी)- पाचोरा शेतकरी सहकारी संघाच्या संचालक मंडळाची निवडणूक आजी माजी आमदारांच्या एकजुटीमुळे बिनविरोध झाली.शेतकरी सहकारी संघाच्या 15 जागांसाठी दिनांक 4 फेब्रुवारीला मतदान होणार होते. दिनांक 24 रोजी उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीत जास्तीच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने सहकार पॅनलच्या सर्वच्या सर्व 15 जागा बिनविरोध विजयी झाल्या . त्यानंतर बाजार समितीत आमदार किशोर पाटील, माजी आमदार दिलीप वाघ यांनी संचालकांचा सत्कार करून माहिती दिली.
विरोधकांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे विरोधकांचे आभार व्यक्त करण्यात आले. प्रचंड आर्थिक विवंचनेत शेतकरी संघ असून राज्य सरकारच्या मदतीने संघाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी संघटित प्रयत्न करणार असल्याचे आमदार किशोर पाटील व माजी आमदार दिलीप वाघ यांनी सांगीतले. आजी माजी आमदारांचे सहकार पॅनल होते. माघारीच्या अगोदरच महिला राखीवच्या 2 व अनुसूचित जाती जमातीची 1 अशा 3 जागा बिनविरोध होत्या. उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी उमेदवारी अर्ज माघार झाल्याने सर्वच्या सर्व 15 जागा बिनविरोध निवडून आल्या.
मार्केट कमिटीत पत्रकार परिषदेच्या वेळी गणेश पाटील , प्रकाश पाटील, चंद्रकांत धनवडे, सुनील पाटील ,हर्षल पाटील , विजय पाटील , प्रकाश तांबे, प्रताप पाटील , रणजीत पाटील , खलील देशमुख उपस्थित होते . अनिल पाटील यांनी आभार मानले.
बिनविरोध निवडून आलेले संचालक =
सोसायटी मतदारसंघ = प्रकाश निकम (नाचणखेडा) सुनील पाटील (माहिजी) वसंत पाटील (घुसर्डी) रमेश पाटील (वाडी ) विशाल पाटील (साजगाव) प्रवीण गुजर (पिंपळगाव हरेश्वर) नरेंद्र पाटील (पाचोरा)
व्यक्तिशः मतदारसंघ = शिवदास पाटील (सारोळा ) अनिल पाटील (गाळण) शरद पाटील (पाचोरा)
महिला राखीव =
अरुणा पाटील (खाजोळा) सुरेखा पाटील (शिंदाड)
ओबीसी राखीव =
दीपक पाटील ( खाजोळा)
भटक्या विमुक्त जाती राखीव =
मच्छिंद्र थोरात (आंबेवडगाव) अनुसूचित जाती जमाती राखीव =फकीरा चांभार (वरखेडी)
आजी माजी आमदारांच्या हस्ते नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला .