मुंबई,(प्रतिनिधी)- गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ.केतकी पाटील यांची महाराष्ट्र भाजप महिला प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली असून
नियुक्तीचे पत्र पक्ष प्रवेशानंतर लागलीच
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्याहस्ते देण्यात आले.
मोदींच्या नेतृत्वार विश्वास ठेवत काँग्रेसचे नेते डॉ.उल्हास पाटील यांनी आपल्या कन्या डॉ. केतकी पाटीलसह पाचशेपेक्षा अधिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह आज दिनांक २४ रोजी ठीक २ वाजता मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.त्यानंतर पक्षाने डॉ. केतकी पाटील यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे.