Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एरंडोलमध्ये समाजकंटकांकडून मध्यरात्री दगडफेक गाड्यांची तोडफोड

२९ संशयित ताब्यात ; शहरात तणावपूर्ण वातावरण

najarkaid live by najarkaid live
January 24, 2024
in जळगाव
0
एरंडोलमध्ये समाजकंटकांकडून मध्यरात्री दगडफेक गाड्यांची तोडफोड
ADVERTISEMENT
Spread the love

एरंडोल-आयोध्या येथील श्रीराम मंदिर लोकार्पणानिमित्त शहरात आयोजित करण्यात आलेले सर्व कार्यक्रम शांततेत पार पडल्यानंतर काल (ता.२२)रात्रीअकरा वाजेच्या सुमारास एका गटातील समाजकंटकांनी अचानक दगडफेक करूनगाड्यांची तोडफोड करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.पोलिसांनी त्वरित घटनास्थळी जाऊन दगडफेक करणा-यांवर लाठीमार करून त्यांना पांगवले.सद्यस्थितीत शहरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.पोलिसांनी दगडफेक करणा-या २९ संशयितांना ताब्यात घेतले असून काही जन फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.समाजकंटकांनी पोलिसांच्या गाडीवर देखील दगडफेक करून काचा फोडल्या.दगडफेकीत पोलिसांसह काही नागरिक जखमी झाले.

याबाबत माहिती अशी,की गांधीपुरा भागातील शरद सुकदेव चौधरी या युवकास काल (ता.२२) रात्री दहा वाजेच्या सुमारास एका गटातील दोन युवकांनी घरात घुसून मारहाण केली.युवकास मारहाण केल्यानंतर सदर युवकास मारण्यासाठी पन्नास ते शंभर युवकांचा जमाव त्याठिकाणी जमा झाला.याबाबतची माहिती हवालदार अनिल पाटील यांना गांधीपुरा भागात एका युवकास मारहाण करून जमाव
जमला असल्याचा फोन आला.घटनेची माहिती समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे,उपनिरीक्षक शरद बागल,हवालदार अनिल पाटील,अकिल मुजावर,योगेश
जाधव,मिलिंद कुमावत हे पोलीस वाहनाने घटनास्थळी दाखल झाले.चुनाभट्टी परिसरात असलम रशीद पिंजारी यांचेसह एका गटातील पन्नास ते शंभर युवक त्याठिकाणी जमा झाले होते.सर्व युवक भावना भडकावणा-या घोषणा देत होते.

तर दुस-या बाजूला देखील युवकांचा जमाव जमा झाला होता.पोलिसांनी युवकांचा एका जमावाला थांबवून ठेवले मात्र चुनाभट्टी परिसरातील युवक घोषणा देवून शांतता धोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत होते.घोषणा देणा-या युवकांना पोलीस समजावण्याचा प्रयत्न करीत असतांना युवकांनी पोलिसांवरच दगडफेक करण्यास सुरुवात केली.पोलिसांनी घटनेची माहिती पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांना देवून अतिरिक्त पोलीसबळ घेवून येण्याचे कळवले.अतिरिक्त पोलीसबळ आल्यानंतर पोलिसांनी संतप्त झालेल्या युवकांवर लाठीमार करून त्यांना पांगवले.युवकांनी केलेल्या दगफेकीत सहाय्यक पोलीस गणेश अहिरे यांचेसह
कर्मचारी जखमी झाले.पोलिसांनी लाठीमार सुरु केल्यानंतर युवक पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतांना काही युवक खड्ड्यांमध्ये पडून जखमी झाले.

त्यानंतरदेखील युवकांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक सुरूच
ठेवली.पारोळा,धरणगाव,कासोदा येथील पोलीस अधिकारी कर्मचा-यांसह शहरात दाखल झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.पोलिसांनी दगडफेक करणा-या २९
युवकांना ताब्यात घेतले असून मुख्य संशयित असलम पिंजारी व त्याचे पंधरा ते वीस काही साथीदार घटनास्थळावरून फरार झाले.त्यानंतर एका गटातील
युवकांनी ज्ञानदीप चौकात देखील दगडफेक करून मोटरसायकली आणि चारचाकी वाहनांची तोडफोड केली.तसेच कसाई मस्जिद परिसरात देखील दगडफेक करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.याबाबत हवालदार मिलिंद कुमावत यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीसस्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून
पोलिसांनी २९ संशयितांना ताब्यात घेतले असून फरार असलेल्या मुख्य संशयितांसह अन्य फरार झालेल्यांचा शोध घेत आहे.तहसीलदार सुचिता चव्हाण देखील मध्यरात्री उशिरापर्यंत घटनास्थळी थांबून होत्या.शहरात ठिकठीकाणी
पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून तिन दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहेत.आज सकाळी पोलीस अधीक्षक एस राजकुमार यांनी शहरात भेट
देवून घटनेची माहिती जाणून घेतली.चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,उपअधीक्षक सुनील नंदनवाळ शहरात तळ ठोकून आहेत.दुपारी चार
वाजेच्या सुमारास आमदार चिमणराव पाटील यांनी पोलीसस्टेशनला भेट देवून माहिती जाणून घेतली.शहरात वाड निर्माण करणा-या समाजकंटकांविरोधात कडक
कारवाई कारच्या सुचना त्यांनी पोलीस प्रशासनाला केल्या.शहरात विविध अफवा पसरविल्या जात असल्यामुळे प्रमुख बाजरापेठेसः अन्य भागातील व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली होती.नागरिकांनी कोणत्याही अफवांवर
विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

PM मोदी देशाला देणार नवी भेट, सुरू होणार ‘ही’ रेल्वे सेवा

Next Post

भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या डॉ. उल्हास पाटीलांचा कन्या डॉ. केतकी पाटीलसह भाजपात प्रवेश!

Related Posts

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

April 28, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

April 28, 2025
हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

April 28, 2025
जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

April 28, 2025
कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us