विविध घोषणांनी परिसर दणाणला
जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळी ११ वाजता सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी सातवा वेतन आयोग लागू करावा यासाठी विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी आणि अधिकारी संघटना, मागासवर्गीय संघटना,महाराष्ट्र युनिव्हर्सिटी फॉर्म आदी संघटनांतर्फे शिवतरित मैदानापासून ते सहसंचालक कार्यालयापर्यंत मोर्चाचे काढण्यात आला . सुमारे अडीचशेच्यावर कर्मचाऱयांनी आपला सहभाग नोंदविला . यावेळी घोषणांनी परिसर दणानून गेला होता.
आवेदन कुटिररहित सातवा वेतन आयोग लागू करणे , महाविद्यालये व विद्यापीठांमधील रिक्त जागा भरणे, शिक्षकेतर ३० टक्के कपातीचे धोरण रद्द करणे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. याप्रसंगी मागासवर्गीय संघटनेचे अध्यक्ष जयंत सोनवणे, प्रमोद चव्हाण,अरुण सपकाळे,संजय सपकाळे,राजू सोनवणे,महेश पाटील,दुर्योधन साळुंखे,ईसार पाटील,आधार कोळी, एस आर गोहिल, कुंडलिनी चव्हाण आदी कर्मचारी उपस्थित होते.