प्रवाशांना घेऊन विमानाने उड्डाण भरलं खरं, पण १७ हजार फूट उंचीवर असताना अचानक इंजिन फेल झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी समोर आल्याने प्रचंड खळबळ उडाली. दरम्यान या विमानात १६० प्रवासी प्रवास करत होते.
इंजिन फेल झाल्याचं कळताच विमानातील प्रवाशी प्रचंड घाबरल्याने आरडाओरड सुरू केली. मात्र, पायलटने सतर्कता दाखवत विमानाचे इमर्जन्सी सुरक्षित लँडिंग केले आणि विमानातील १६० प्रवाशांना सुरक्षित विमानतळावर आणले.अंगावर काटा आणणारा हा थरार जयपूरहून कोलकात्याला जाणाऱ्या इंडिगो कंपनीच्या विमानात सोमवारी संध्याकाळी ६:३० वाजेच्या सुमारास घडला. सुदैवाने या घटनेत सर्व प्रवासी सुखरुप आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगो कंपनीच्या विमानाने सोमवारी सायंकाळी जयपूरहून कोलकात्याला जाण्यासाठी उड्डाण भरले. या विमानातून १६० प्रवासी प्रवास करीत होते. विमान १७ हजार फूट उंचीवर असताना अचानक पक्षी आदळल्याने इंजिनमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाली.ही बाब लक्षात येताच पालयटने प्रवाशांना सतर्क केले. दरम्यान, वैमानिकाने हवाई वाहतूक सेवेशी तत्काळ संपर्क साधला आणि विमानाचे एमर्जन्सी लँडिंग करत जयपूर विमानतळावर परत आणले. विमानतळावर आपत्कालीन लँडिंग होताच प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला.
Thank you to our amazing team for their efforts to ensure smooth operations. Days like these are a testament to the hard work that goes into maintaining operations even in bad weather conditions. We would also like to thank our customers for choosing us as their travel partner. pic.twitter.com/qkgSYCdWq8
— IndiGo (@IndiGo6E) January 22, 2024
विमानात बिघाड असतांना सुरळीत ऑपरेशन्स सुनिश्चित करण्यासाठी तवैमानिक व त्यांच्या टीम ने केलेल्या प्रयत्नांबद्दल इंडिगो प्रशासनाने आभार मानले आहेत.