जळगाव,(प्रतिनिधी)- आज देशासह जगभरात आनंदाचा क्षण असून गेल्या अनेक वर्षपासून प्रतीक्षेत असलेल्या आयोध्यातील श्रीराम मंदिर सोहळा होतं असतांना आज 2:38 मिनिटांनी काँग्रेस पक्षाकडून निलंबणाचे पत्र मिळाले आहे.आता पर्यंतच्या काँग्रेस पक्षाच्या आंदोलनात माझा सहभाग होता व पक्षाचे प्रत्येक आदेश पाळले असं असतांना कोणतीही नोटीस न देता मला पक्षातून मला निलंबित केले यामुळे मी व्यथित झालो आहे.
डॉ. केतकी पाटीलचं ठरलंय
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यावर विश्वास ठेवून डॉ. केतकी पाटील यांचा भाजपा प्रवेश होण्याचं ठरलं आहे, खरं असलं तरी मुलीच्या भजपा प्रवेशामुळे माझं निलंबन झालं हे माझ्यासाठी अचंबित करण्यासारखं आहे.
ही लोकशाही नाही….
मला कुठलीही नोटीस नाही, माझं म्हणणं एकूण न घेता… मला नैसर्गिक न्याय न देता थेट पक्षातून निलंबन करणं म्हणजे ही तर एकाधिकारशाही असून यात लोकशाही नसल्याचं डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितलं.
दुसरा विचार करणार
आता पक्षातून काढुनच टाकल्याने आता दुसरा विचार करणार असल्याचं डॉ. उल्हास पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.