अयोध्यात उद्या २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रभूश्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होत असतानाराज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीसांनी ३०वर्षे जुनं वर्तमान पत्रात छापून आलेला फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपणही कारसेवक होतो आणि अयोध्येला कारसेवेसाठी गेलो होतो असं सांगितलं होतं यावरून त्यांच्यावर विरोधकांनी टीका करताना पुरावाही मागितला होता आज देवेंद्र फडणवीस यांनी कारसेवेला जातानाचे वर्तमान पत्रात छापून आलेला फोटो शेअर केल्याने विरोधकांना हा घ्या पुरावा असचं काहीसं उत्तर यातून दिल्या गेलं आहे.
नागपुरातून अयोध्येतील कारसेवेला जात असतानाचे रेल्वे स्थानकावरील छायाचित्र देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले आहे. नागपुरातील ‘नवभारत’ या वृत्तपत्रात त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर रेल्वेस्थानकावरचे छायाचित्र प्रकाशित झाले होते. हा फोटो शेअर करत देवेंद्र फडणवीस यांनी मीसुद्धा कारसेवा करायला गेलो होतो हे पुराव्यासह सांगितलं.
या फोटोवर संजय राऊत म्हणाले
देवेंद्र फडणवीसांनी ३०वर्षे जुनं वर्तमान पत्रात छापून आलेला फोटो शेअर केल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी त्या फोटोवर टीका केली आहे, ते म्हणाले की देवेंद्र फडणवीस हे कारसेवकांना स्टेशनला सोडायला गेले असतील असं म्हणत टोला लगवला आहे तर आमच्याकडे प्रत्यक्ष घुमूटावरचा व्हिडीओ, फोटो आहेत, बाळासाहेब ठाकरेंनी त्याची जबाबदारी देखील स्वीकारली होती.. ते तर पळून गेले होते, सर्वानाचं माहित आहे असं म्हणत संजय राऊत यांनी पलटवार केला आहे.
देवेंद्र फडणवीसांनी ट्विट मध्ये काय म्हटलं
जुनी आठवण…
नागपूरहून प्रकाशित होणार्या ‘दै. नवभारत’ने मला हे छायाचित्र आवर्जून पाठविले. अयोध्येला जाणार्या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली, तेव्हाचे हे छायाचित्र.
छायाचित्रकार शंकर महाकाळकर यांनी ते टिपले आहे. उद्या (22 जानेवारी) अयोध्येत प्रभूश्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होत असताना या छायाचित्राच्या माध्यमातून जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे…
नवभारत परिवाराचा मी अतिशय आभारी आहे.