जळगाव,(प्रतिनिधी)- आयोध्य येथे आज २२ जानेवारी २०२३ रोजी प्रभू श्रीराम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडत असून पंतप्रधान मोदींच्या आवाहना नंतर देशभरात उत्सव साजरा होतं आहे त्याच पार्श्वभूमीवर जळगाव येथे भजपा नेते तथा पर्यावरण मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रेरणेने माजी उपमहापौर अश्विन सोनवणे यांच्या संकल्पनेतून जळगाव शहरातील मुळजी जेठा महाविद्यालयाच्या क्रीडांगणात १५००० चौरस फूट जागेवर भव्य रांगोळीच्या माध्यमातून प्रभू श्रीरामाचे चित्र सकरण्यात आले आहे, याचं सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सुद्धा चित्र साकरण्यात आले आहे यासाठी कलाछंद आर्ट्स फाउंडेशनचे आर्टिस्ट गेल्या तीन दिवसापासून परिश्रम घेत आहेत.
रांगोळीच्या माध्यमातून उभारण्यात आलेले भव्य चित्र पाहण्यासाठी आज पासून खुले करण्यात येणार आहेत. दरम्यान मंत्री गिरीश महाजन प्रमुख उपस्थिती राहणार आहे.असे आयोजक माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेचे जिल्हाध्यक्ष
इंजी. राहुल सोनवणे,मुविकोराज कोल्हे, भुषण भोळे,
रुपेश ठाकूर, यशवंत पाटील यांनी कळविले आहे.