राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विधीमंडळात सुनावणी सुरु असून अजित पवार गटाचे नेते सुनिल तटकरे यांनी विधीमंडळात एक प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. यात शरद पवारांबद्दल मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. शरद पवार हे हुकुमशाह पद्धतीने पक्ष चालवत असून ते फक्त काही ठराविक लोकांचं ऐकत असल्याचे म्हटले आहे.
अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट बाहेर पडल्याने पक्षात फूट पडली आहे. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये खरा पक्ष कुणाचा असा वाद सुरु असून याबाबत विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्यापुढे सुनावणी सुरु आहे. शनिवारी अजित पवार गटाकडून राहूल नार्वेकर यांच्याकडे एक प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. यात शरद पवार हे हुकुमशाह पद्धतीने पक्ष चालवत होते. ते कोणत्याही नेत्याचं ऐकत नसून काही ठराविक लोकांचंच ऐकत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रतिज्ञापत्रामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच शरद पवार हे ठराविक लोकांचंच ऐकत असल्यामुळे अजितदादांना राष्ट्रीय अध्यक्ष केल्याचे वक्तव्य अजित पवार गटाचे नेते अनिल पाटील यांनी केले आहे.