पाचोरा (प्रतिनिधी)- राज्यात एकेकाळी प्रथम क्रमांकावर असलेल्या सहकारातील पाचोरा तालुक्याचे शेतकरी सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणुक प्रक्रिया सुरू आहे. २४ जानेवारीला अंतिम माघर असून मतदान ४ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
गेल्या सुमारे तिन दाशका पासून शेतकरी सहकारी संस्था माजी आमदार दिलीप वाघ यांच्या नेतृत्वाखाली आहे. होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी महायुतीचे घटकपक्ष, राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ आणि शिवसेनेचे विद्यमान आमदार किशोर पाटील एकत्रित लढवीत असून मा. आ. दिलीप वाघ गटाचे ९ तर आमदार किशोर पाटील यांचे ६ असे पंधरा उमेदवार रिंगणात असतांना २४ जानेवारी च्या माघारी पूर्वीच माजी आमदार दिलीप वाघ यांच्या पॅनल मधील महिला राखीव गटातून सुरेखा श्रीकांत पाटील, अरुणा राजेंद्र पाटील तर अनुसूचित जाती जमाती गटातून फकिरा बुधा पाटील हे बिनविरोध निवडून आल्याने त्यांच्या सत्कार करण्यासाठी आणि पॅनलची पुढील भूमिका मांडण्यासाठी माजी आमदार दिलीप वाघ आणि आमदार किशोर पाटील यांनी संयुक्तिक पत्रकार परिषद घेतली. यावेळी सभापती गणेश पाटील, उप सभापती प्रकाश पाटील, संचालक प्रकाश तांबे, माजी सभापती एन. सी. पाटील, राजेंद्र पाटील, माजी संचालक रणजित पाटील, चंद्रकांत धनवडे, शिवदास पाटील, राष्ट्रवादी पदाधिकारी हर्षल पाटील, विजय कडु पाटील, अॅड. अविनाश सुतार, महेश माळी, गोपी पाटील आदी उपस्थित होते.
माजी आमदार दिलीप वाघ म्हणाले की, गेल्या सहकार महर्षी सुपडू आण्णा, कै. के. एम. (बापू) पाटील, कै. ओंकार वाघ यांच्या नंतर शेतकी संघाची ३३ वर्षांपासून माझ्या नेतृत्वात संचालक मंडळ कार्यरत आहे. बदलत्या औद्योगिकीकरणामुळे या संस्थेचे उद्योग – व्यवसाय बंद झाले. आगामी काळात संस्था नविन जागेत स्थलांतर होणार असून त्या ठिकाणी रोजगार निर्मिती करणारे नविन उद्योग सुरू करणार आहोत. विरोधक शेतकी संघाची जागा विक्री बाबत गैरसमज पसरवित असले तरी मतदार आमच्या सोबत असून त्यांना योग्य जागा दाखवतील. शेतकी संघाची निवडणुक बिनविरोध करण्याचा प्रयत्न आहे. आणि शेवटी निवडणुक झालीच तर आमचे पॅनलचे सर्व उमेदवार निवडून येणार आहे.
आमदार किशोर पाटील म्हणाले की, माजी आमदार दिलीप वाघ यांच्या नेतृत्वात शेतकी संघाचा कारभार योग्य हाताळला जात आहे. मी आणि मा. आ. दिलीप वाघ यांच्या बाजूने सर्वात जास्त ठराव असल्याने आमच्या उर्वरित १२ उमेदवार ७० / ३० च्या फरकाने विजयी होणार आहे. विरोधकांकडे ही निवडणुक लढण्यासाठी उमेदवार मिळत नाही. कृष्णापुरीची संस्था ताब्यात असली म्हणजे कोणी सहकार महर्षी होत नसल्याचा टोला आमदारांनी विरोधकांना लगावला. शेतकी संघात १०० टक्के आमचीच सत्ता येणार असून संघाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आम्ही कार्य करणार आहोत.
पाचोरा येथील शेतकरी संघाची निवडणूक लागलेली असून पंधरा जागांसाठी ६३ उमेदवारांनी फॉर्म भरलेली असून २४ जानेवारी अंतिम माघारीची तारीख असून सर्व पक्षांनी फॉर्म भरलेले असून पाचोरा तालुक्याचे आमदार किशोर पाटील व माजी आमदार दिलीप वाघ यांनी युती केली असून त्यामध्ये माजी आमदार दिलीप वाघ यांनी नऊ उमेदवार उभे केले आहे व आमदार किशोर पाटील यांचे सहा उमेदवार असून वैशाली सूर्यवंशी व अमोल शिंदे यांनीही पंधरा जागेसाठी फॉर्म भरलेले असून आज रोजी माजी आमदार दिलीप वाघ यांच्या गटाच्या तीन जागा बिनविरोध झाल्या असता दिलीप वाघ व आमदार किशोर पाटील यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली की, शेतकरी हितासाठी शेतकी संघाची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करू. बिनविरोध झाल्यास अधिक आनंद होईल व निवडणूक झालीच तर आमच्या गटाचे सर्व उमेदवार निवडून येतील.