पारोळा:ओमनीमध्ये गॅस भरताना सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना पारोळा तालुक्यातील म्हसवे शिवारातील राजस्थानी हॉटेलनजीक घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नाही.
याबाबत असे की म्हसवे शिवारातील राजस्थानी हॉटेलच्या मागे रात्री ९.३० वाजेच्या सुमारास ओमनी गाडीमध्ये गॅस भरताना गॅस टाकीने अचानक पेट घेतला. त्यामुळे घटनास्थळी असलेल्या दोन गाड्यांमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट झाला. दरम्यान, घटनास्थळी जवळपास डझनभर गॅस सिलिंडर पडलेल्या स्थित असल्याचे दिसून आले.