आयोध्या – सोमवार २२ जानेवारीला होत असलेल्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी प्रभू श्री रामाच्या मूर्तीचे फोटो शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले असून प्रभू श्री रामाच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठेपूर्वीच फोटो लीक करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय श्री राम मंदिर ट्रस्टने घेतला आहे.
प्रभू श्री रामाच्या मूर्तीचे फोटो एल अँड टीच्या अधिकाऱ्यांनी केला असावा असा ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना संशय आहे. अयोध्येत उभ्या राहिलेल्या राम मंदिराचे बांधकाम आणि डिझाइन लार्सन अँड टुब्रो (L&T) आणि टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) च्या तांत्रिक सहाय्याने केले आहे. असा संशय आहे की एल अँड टी कंपनीतील कर्मचारी किंवा अधिकाऱ्याने हा फोटो काढून व्हायरल केला असावा मात्र, हा फोटो व्हायरल कसा झाला . हे अद्याप कळू शकलेले नाही.
रामरायाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला 10 अवतार कोरण्यात आले आहेत. उजव्या बाजूला मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, कमल, हनुमानाचे चित्र कोरण्यात आले आहे, तर डाव्या बाजूला परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध, कल्की आणि गरुड यांची चित्रे कोरण्यात आली आहेत. मूर्तीचे एकूण वजन तब्बल 200 किलो इतके आहे.