काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींची ‘भारत जोडो न्याय यात्रा’, गुरुवार, दि. आसाममध्ये पोहोचणार आहे. मात्र, यापूर्वीच एक घटना आसाम काँग्रेसमध्ये उघडकीस आली आहे. आसाम युथ काँग्रेसच्या माजी अध्यक्षा अग्नकिता दत्ता यांनी आंदोलन करत राहुल गांधींकडेच न्यायाची मागणी केली आहे. “काँग्रेसच्याच एका कार्यकर्त्याने माझा लैंगिक छळ केला.”, असा आरोपही त्यांनी केला आहे. एकेकाळी आसामच्या युथ काँग्रेसच्या अध्यक्षा असलेल्या दत्ता यांना पक्षातून त्रास दिलला जाऊ लागला. आता एएनआय या वृत्तसंस्थेने केलेल्या दाव्यानुसार त्यांना त्यांनी राहुल गांधींकडे आपली आर्जव केली आहे.
“गेले १० महिने मी यातना भोगतेयं. मी वेळोवेळी न्याय मागितला मात्र, मला पक्षातून निलंबित करण्यात आलं. मी गेले १० महिन्यात अन्य कुठल्याही पक्षात जाऊ शकले असते पण मी तसे केले नाही. मी पक्षात नसले तरीही पक्ष संघटना मजबूतीचे काम केले. लोकं आता माझ्यासोबत उभी आहेत. मी राहुल गांधींना एक निवेदन देणार असून मला न्याय हवा आहे. हा न्याय मला राहुल गांधीच देतील, अशी मला आशा आहे मला न्याय मिळावा म्हणून मी बाहेर पडलेयं. मला आशेचा किरण दिसत आहेत. राहुल गांधींनी जेव्हा भारत जोडो यात्रा सुरू केली तेव्हा मला आशेचा किरण दिसत आहे.”, असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा पाचवा दिवस नागालँडच्या तुली ते आसामच्या जोरहाटपर्यंत, असा सुरू होता. राहुल गांधींनी इथे एका सभेला संबोधित केले. जोपर्यंत आम्हाला न्यायाचा हक्क मिळत नाही. तोपर्यंत आमचा प्रवास सुरू राहील, असेही राहुल गांधी म्हणाले.
कोण आहे अंकिता दत्ता?
अंकिता दत्ता या आसामच्या युवक काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आहेत. २२ एप्रिल २०२३ रोजी काँग्रेसने आसाम प्रदेश युवक काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा, अंकिता दत्ता यांची ‘पक्षविरोधी कारवायांसाठी’ काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली होती. त्यांनी युथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बीव्ही यांच्या विरोधात छळवणूकीचा
आरोप लावला होता. त्यांनी पोलीसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर त्यांची काँग्रेसचे सदस्यत्वही काढून घेतले.